Lokmat Sakhi >Social Viral > किचन ट्रॉली, लाकडी फर्निचर काळपट झालं? काही मिनिटांतच करा चकाचक, बघा सोपा उपाय 

किचन ट्रॉली, लाकडी फर्निचर काळपट झालं? काही मिनिटांतच करा चकाचक, बघा सोपा उपाय 

How To Clean Kitchen Trolley Or Kitchen Cabinet?: लाकडी फर्निचर किंवा स्वयंपाक घरातले किचन कॅबिनेट, किचन ट्रॉली आणि त्यांचे हँडल्स काळे पडले असतील तर ते स्वच्छ करण्याचा एक सोपा उपाय बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 12:19 PM2024-08-30T12:19:47+5:302024-08-30T12:20:41+5:30

How To Clean Kitchen Trolley Or Kitchen Cabinet?: लाकडी फर्निचर किंवा स्वयंपाक घरातले किचन कॅबिनेट, किचन ट्रॉली आणि त्यांचे हँडल्स काळे पडले असतील तर ते स्वच्छ करण्याचा एक सोपा उपाय बघा...

how to clean oily kitchen trolley or kitchen cabinet? simple home remedies to clean wooden furniture stains within few minutes | किचन ट्रॉली, लाकडी फर्निचर काळपट झालं? काही मिनिटांतच करा चकाचक, बघा सोपा उपाय 

किचन ट्रॉली, लाकडी फर्निचर काळपट झालं? काही मिनिटांतच करा चकाचक, बघा सोपा उपाय 

Highlightsकिचन ट्रॉली स्वच्छ करण्यासाठी खूप जास्त वेळ आणि मेहनत लागते. त्यामुळे मग आपण ते काम आज करू- उद्या करू असं म्हणत लांबवत जातो.

स्वयंपाक घरातल्या किचन ट्रॉली आपल्या स्वयंपाक घराची शोभा नक्कीच वाढवतात. शिवाय भरपूर पसारा त्यांच्या पोटात अगदी आरामात लपून जातो. पण जेव्हा या ट्रॉली काळपट पडतात किंवा त्यांचे स्टीलचे हँडल काळे पडतात तेव्हा आपल्या स्वयंपाक घराचा सगळा लूक जातो. ते अस्वच्छ आणि घाण दिसू लागते. म्हणूनच स्वयंपाक घरातल्या किचन ट्रॉली, किचन कॅबिनेट्स यांच्यावर पडलेले काळपट डाग कसे स्वच्छ करायचे, त्याचा हा एक सोपा उपाय बघून घ्या (how to clean kitchen trolley or kitchen cabinet?). तुमच्या घरातलं इतर कोणतंही लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठीदेखील हा उपाय उपयुक्त ठरणारा आहे. (simple home remedies to clean wooden furniture stains within few minutes)

 

किचन ट्रॉलींवरचे काळपट डाग काढण्याचा उपाय

बऱ्याचदा असं होतं की किचन ट्रॉली स्वच्छ करण्यासाठी खूप जास्त वेळ आणि मेहनत लागते. त्यामुळे मग आपण ते काम आज करू- उद्या करू असं म्हणत लांबवत जातो.

चेहऱ्यावरची चमक गेली- त्वचा डल दिसते? 'हा' उपाय करा- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो येईल

असं करण्यात ते मग आणखीनच घाण होत जातात. असं तुमचंही होत असेल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. कारण यामध्ये कमीतकमी मेहनतीत आणि कमीतकमी वेळात किचन ट्रॉली, लाकडी फर्निचर अगदी लख्खं चमकेल. हा उपाय simply.marathi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि डिश वॉश लिक्विड हे ३ पदार्थ लागणार आहेत. 

 

सगळ्यात आधी एका भांड्यात १ कप गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये २ चमचे व्हिनेगर टाका. १ चमचा लिक्विड डिशवॉश टाका आणि १ टीस्पून बेकिंग सोडा टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

किचनमधल्या टाईल्स खूपच मेणचट होतात? ५ गोष्टी लक्षात ठेवा- स्वयंपाक घर नेहमीच राहील लख्खं

लाकडी फर्निचरवर, ट्रॉलीवर लागेल तस शिंपडा. त्यानंतर घासणीने अगदी हळुवार फर्निचर घासा आणि त्यानंतर लगेच एखाद्या सुती कोरड्या कपड्याने ते पुसून घ्या. तुम्हाला ट्रॉलीचा काळपटपणा लगेचच कमी झाल्यासारखा वाटेल. जर काळपटपणा कमी झाल्यासारखा जाणवला नाही किंवा ट्रॉली खूपच घाण झाल्या असतील तर पुन्हा थोडं लिक्विड शिंपडा आणि थोडा आणखी जोर लावून घासा. काळपटपणा निघून जाईल.


 

Web Title: how to clean oily kitchen trolley or kitchen cabinet? simple home remedies to clean wooden furniture stains within few minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.