तवा ही स्वयंपाक घरात अगदी रोजच्यारोज लागणारी वस्तू. लोखंडाचा तवा असेल तर तो दगडाने किंवा तारेच्या घासणीने घासून स्वच्छ करता येतो. पण नॉनस्टिक पॅन असेल तर तो मात्र स्वच्छ करायला थोडा जड जातो. आपण डोसे करण्यासाठी जो तवा वापरतो, तो बऱ्याचदा कोपऱ्यांमध्ये चिकट- तेलकट झालेला असतो. कारण डोसा करताना वापरलेलं जास्तीचं तेल तव्याच्या कोपऱ्यात जमा होत जातं (How to clean oily stains on nonstick pan?). असा चिकट- तेलकट झालेला तवा न घासता कमीतकमी मेहनतीमध्ये स्वच्छ कसा करायचा, याचा एकदम सोपा उपाय आता पाहा... (Simple remedies to clean dirty nonstick pan)
चिकट- तेलकट झालेला तवा स्वच्छ करण्याचा उपाय
चिकट तेलकट झालेला तवा कसा स्वच्छ करायचा याचा एक सोपा उपाय nanikapitara_ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
उगाच खर्च करण्यापेक्षा १ संत्री घेऊन घरीच तयार करा व्हिटॅमिन सी सीरम- त्वचा होईल चमकदार
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तवा गॅसवर ठेवा आणि चांगला गरम करून घ्या.
यानंतर या गरम झालेल्या तव्यावर अर्धी वाटी पाणी टाका आणि जिथे घाण जमा झाली आहे, त्या कोपऱ्यांमध्ये इनो टाका.
इनो टाकल्यानंतर ५ ते ७ मिनिटे तवा तसाच राहू द्या. यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्याने तवा नुसता पुसून घ्या. तव्यावर चिकटलेली सगळी घाण निघून जाईल.
ट्रॅडिशनल लूक देणारी स्टायलिश बुगडी घ्यायची? बघा लेटेस्ट फॅशनच्या ८ सुपरवॉव बुगडी डिझाईन्स...
हा उपाय एकदा करून जर तवा स्वच्छ झाला नाही, तर आणखी एक- दोन वेळा हा उपाय करा.
हा उपाय करून तुम्ही लोखंडी तवा तसेच कढई देखील स्वच्छ करू शकता.