Lokmat Sakhi >Social Viral > ऑक्सिडाईज ज्वेलरी खराब होवू नये म्हणून ३ टिप्स, ज्वेलरी वर्षानुवर्षे दिसेल सुंदर-नव्यासारखी

ऑक्सिडाईज ज्वेलरी खराब होवू नये म्हणून ३ टिप्स, ज्वेलरी वर्षानुवर्षे दिसेल सुंदर-नव्यासारखी

Tips for Maintaining Oxidised Jewellery: ऑक्सिडाईज ज्वेलरीची चमक कमी होऊ नये किंवा ही ज्वेलरी बरेच दिवस टिकून रहावी, म्हणून या काही टिप्स फॉलो करून बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2022 06:33 PM2022-10-03T18:33:05+5:302022-10-03T18:33:32+5:30

Tips for Maintaining Oxidised Jewellery: ऑक्सिडाईज ज्वेलरीची चमक कमी होऊ नये किंवा ही ज्वेलरी बरेच दिवस टिकून रहावी, म्हणून या काही टिप्स फॉलो करून बघा..

How to clean oxidised jewellery? how to keep oxidised jewellery properly? | ऑक्सिडाईज ज्वेलरी खराब होवू नये म्हणून ३ टिप्स, ज्वेलरी वर्षानुवर्षे दिसेल सुंदर-नव्यासारखी

ऑक्सिडाईज ज्वेलरी खराब होवू नये म्हणून ३ टिप्स, ज्वेलरी वर्षानुवर्षे दिसेल सुंदर-नव्यासारखी

Highlightsआता नवरात्र झाल्यानंतर पुढील प्रकारे काळजी  घेऊन हे दागिने चांगले ठेवून द्या. म्हणजे मग ते पुढच्या वर्षीपर्यंत जसेच्या तसे अगदी नव्यासारखे राहतील

सोने, चांदी, मोती असे कोणतेही दागदागिने स्वच्छ करण्याची एक खास पद्धत आहे. त्यानुसार जर आपण दागिन्यांची स्वच्छता  केली तर दागिने अधिक काळ चांगले राहतात, तसंच त्यांची चमकही वर्षानुवर्षे टिकून राहते. नवरात्रीला दांडिया, गरबा  यांच्यासाठी असणाऱ्या ड्रेसिंगवर ऑक्सिडाईज ज्वेलरी आवर्जून घातली जाते. आता नवरात्र झाल्यानंतर पुढील प्रकारे काळजी  घेऊन हे दागिने (How to clean oxidised  Jewellery) चांगले ठेवून द्या. म्हणजे मग ते पुढच्या वर्षीपर्यंत जसेच्या तसे अगदी नव्यासारखे राहतील (Tips for Maintaining Oxidised Jwellery). 

 

ऑक्सिडाईज दागिन्यांची काळजी कशी घ्यावी
१. ओलाव्यापासून दूर ठेवा

दांडिया खेळताना घाम येतो, दागिने ओलसर होतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही दांडिया खेळून घरी याल, तेव्हा काही काळ दागिने मोकळ्या हवेत राहू द्या. मऊ कपड्याने त्यांच्यावरचा ओलावा टिपून घ्या आणि सुकल्यानंतरच दागिने जागेवर ठेवा. ऑक्सिडाईज दागिने जर ओलसर राहिले आणि तसेच कपाटात ठेवले गेले तर लवकरच ते काळे पडतात.

 

२. परफ्यूम मारू नका
ऑक्सिडाईज ज्वेलरी घातल्यानंतर परफ्यूम मारताना काळजी घ्या. परफ्यूममधली रसायने या दागिन्यांसाठी हानिकारक असतात. त्यामुळे एकतर दागिने काळे पडू शकतात किंवा मग त्यांचा रंग उडून जाऊन ते जास्तच पांढरेफटक दिसू शकतात. 

 

३. हवाबंद डबीत ठेवा
ऑक्सिडाईज दागिने खूप काळ जर मोकळ्या हवेत राहिले म्हणजे हवेच्या संपर्कात ठेवले गेले, तरी त्यांच्यावरची चमक कमी हाेऊन ते काळे पडू शकतात. त्यामुळे हे दागिने एखाद्या हवाबंद डब्यात ठेवा किंवा मग अशा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा, जिला कुठेही छिद्र नसेल. 

 

ऑक्सिडाईज दागिने कसे स्वच्छ करायचे?
टोमॅटो आणि बेकिंग सोडा यांचा वापर करून ऑक्सिडाईज दागिने स्वच्छ करता येतात. यासाठी एका वाटीमध्ये टोमॅटोचा रस २ टेबलस्पून घ्या. त्यात २ टीस्पून बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण दागिन्यांवर लावा आणि दागिने स्वच्छ करा. त्यानंतर ते स्वच्छ पुसून पुर्णपणे कोरडे करा आणि त्यानंतरच हवाबंद डब्यात किंवा पिशवित ठेवून द्या.  
 

Web Title: How to clean oxidised jewellery? how to keep oxidised jewellery properly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.