४ ते ५ वर्षांपुर्वी खण साडीचा ट्रेण्ड बाजारात आला. त्या खण साडीवर घालण्यासाठी मग ऑक्सिडाईज ज्वेलरी बाजारात आली. तेव्हापासून ऑक्सिडाईज दागिन्यांचा जबरदस्त ट्रेण्ड सुरू आहे. आजही या दागिन्यांना खूप मागणी आहे. पण चांदीच्या दागिन्यांच्या बाबतीत जी अडचण येते, तीच अडचण ऑक्सिडाईज ज्वेलरीच्या बाबतीत येते (How to clean oxidised jewellery in few minutes). हे दोन्ही प्रकारचे दागिने बरेच दिवस वापरात नसतील तर ते लगेच काळवंडून जातात. तुमचेही ऑक्सिडाईज दागिने काळवंडले असतील तर त्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून पाहा. यामुळे पुन्हा अगदी नव्यासारखे तुमचे दागिने चमकू लागतील. (Home remedies to clean blackish oxidised jewellery)
काळे पडलेले ऑक्सिडाईज दागिने स्वच्छ करण्याचा उपाय
काळे पडलेले ऑक्सिडाईज दागिने पुन्हा अगदी नव्यासारखे स्वच्छ कसे करायचे, याचा एकदम सोपा उपाय artkala4u या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
डार्क सर्कल्समुळे चेहरा खूप विचित्र दिसतो? १ सोपा उपाय करा- आठवडाभरातच दिसेल फरक
आपल्याघरी औषधी गोळ्यांचे जे रिकामे रॅपर्स किंवा कव्हर असतात, ते आपण टाकून देतो. पण इथून पुढे ते टाकून देऊ नका. कारण तुमच्या ऑक्सिडाईज दागिन्यांना चमकविण्यासाठी तेच उपयुक्त ठरणार आहेत.
औषधी गोळ्यांचे रॅपर्स आणि बेकिंग सोडा वापरून ऑक्सिडाईज दागिने कसे स्वच्छ करायचे ते आता पहा.
हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात गोळ्यांचे रॅपर्स किंवा कव्हर टाका. त्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा घाला.
याच भांड्यात तुमचे काळवंडलेले ऑक्सिडाईज दागिने ठेवून द्या. आणि त्यावर कडक पाणी ओता. दागिने व्यवस्थित पाण्यात भिजले जातील एवढं पाणी असावं.
चमकदार त्वचेसाठी जया बच्चन करायच्या 'हा' उपाय, बघा तुमच्याही आई- आजीने केलंय का असं?
एखादा चमचा वापरून दागिने, पाणी वर- खाली करत राहा. पाणी काेमट झालं की दागिने भांड्यातून बाहेर काढून घ्या आणि स्वच्छ कपड्याने पुसून काढा. दागिन्यांचा काळेपणा कमी झालेला असेल.