Lokmat Sakhi >Social Viral > How to clean phone back cover : फोनचं बॅक कव्हर साफ करण्याची सोपी ट्रिक; 2 मिनिटात नव्यासारखा चमकेल फोन

How to clean phone back cover : फोनचं बॅक कव्हर साफ करण्याची सोपी ट्रिक; 2 मिनिटात नव्यासारखा चमकेल फोन

How to clean phone back cover : मोबाईलचे मागील कव्हर टूथपेस्टच्या मदतीने देखील स्वच्छ केले जाऊ शकते. असे केल्याने मळकट मोबाईलचे कव्हर चमकू लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 02:26 PM2022-09-02T14:26:50+5:302022-09-02T14:56:58+5:30

How to clean phone back cover : मोबाईलचे मागील कव्हर टूथपेस्टच्या मदतीने देखील स्वच्छ केले जाऊ शकते. असे केल्याने मळकट मोबाईलचे कव्हर चमकू लागेल.

How to clean phone back cover : How to clean phone back cover follow these home remedies | How to clean phone back cover : फोनचं बॅक कव्हर साफ करण्याची सोपी ट्रिक; 2 मिनिटात नव्यासारखा चमकेल फोन

How to clean phone back cover : फोनचं बॅक कव्हर साफ करण्याची सोपी ट्रिक; 2 मिनिटात नव्यासारखा चमकेल फोन

आजकाल लोक त्यांच्या मोबाईलशिवाय एक मिनिटंही  राहू शकत नाहीत. लोक त्यांच्या फोनची खूप काळजी घेतात. मोबाईल कव्हरही खरेदी करतात. बहुतेक लोक  ट्रांस्परंट फोन कव्हर खरेदी करण्यास प्राधान्य देतात. पण यात अडचण अशी आहे की काही दिवसांनी फोनचे कव्हर पिवळे पडते आणि घाणेरडे दिसू लागते. (How to clean phone back cover) अशा स्थितीत फोनवर कव्हर लावले तर ते फोनचा लूकही खराब करते. अशा स्थितीत फोनचे कव्हर कसे स्वच्छ करावे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया फोनचे कव्हर कसे स्वच्छ करावे. (How to clean phone back cover follow these home remedies)

फोनचे बॅक कव्हर साफ करण्याचे घरगुती उपाय

जर तुमच्या फोनचे मागील कव्हर खराब झाले असेल तर तुम्ही ते सहजपणे स्वच्छ करू शकता आणि ते पुन्हा नवीनसारखे बनवू शकता. मोबाईलचे कव्हर साफ करण्यासाठी तुम्हाला दात स्वच्छ करण्यासाठी ब्रश आणि डिटर्जंटची आवश्यकता असेल. मोबाईलचे कव्हर स्वच्छ करण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी ठेवून मोबाईलचे कव्हर भिजवा. (Easy Way to Clean Transparent Mobile Cover)

यानंतर, त्या पाण्याच्या भांड्यात  डिटर्जंट विरघळवा. त्यानंतर मोबाईलचे मागील कव्हर टूथब्रशने स्वच्छ करा. मोबाईल कव्हर साफ केल्यानंतर, त्याच पाण्यात 15 मिनिटे सोडा. आता तीच प्रक्रिया तुम्हाला पुन्हा करावी लागेल. पुन्हा पुन्हा घासल्याने तुमच्या मोबाईलचे कव्हर साफ होईल.

मोबाईलचे मागील कव्हर टूथपेस्टच्या मदतीने देखील स्वच्छ केले जाऊ शकते. असे केल्याने मळकट मोबाईलचे कव्हर चमकू लागेल. मोबाईलचे मागील कव्हर स्वच्छ करण्यासाठी प्रथम एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात मोबाईलचे कव्हर ठेवा. यानंतर मोबाईलच्या कव्हरवर टूथपेस्ट लावा.

आता टूथब्रशच्या मदतीने मोबाईलचे मागील कव्हर स्वच्छ करा. पिवळे डाग जाईपर्यंत कव्हर स्वच्छ करत रहा. जर तुमच्या मोबाइल कव्हरचे ऑक्सिडीकरण झाले असेल, तर या उपायांमुळे मोबाइलच्या मागील कव्हरचा पिवळापणा दूर होणार नाही. यासाठी मोबाईलच्या मागील कव्हरपेक्षा जास्त महाग असलेले रसायन लागेल. अशा स्थितीत, बहुतेक लोकांना नवीन कव्हर घेणे देखील आवडेल.

Web Title: How to clean phone back cover : How to clean phone back cover follow these home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.