चादरी आणि बेड कव्हर्सप्रमाणेच उशा नियमितपणे स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. उशांवर आपण ८ तास डोकं ठेऊन झोपतो. डोक्यातील घाम व तेलामुळे उशा हळूहळू घाण होऊ लागतात. ते वेळेवर न धुतल्यास त्यातून प्रचंड दुर्गंधी येते. यासह उशामधील डाग अधिक कळकट दिसू लागतात. अशा वेळी उशा स्वच्छ कसे करावे हे कळत नाही.
उशा धुण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. उशा वेळेवर साफ न केल्यास त्यावरील डाग अधिक घट्ट होत जातात. अशा परिस्थितीत एक किवा दोन महिन्यांमध्ये उशा साफ करत राहणे आवश्यक आहे. उशी स्वच्छ करण्यासाठी या काही टिप्स फॉलो करून पाहा(How to Clean Pillows and Keep Them Smelling Fresh).
उशा साफ करण्यासाठी लागणारं साहित्य
लिक्विड साबण
स्वयंपाकघरात खूप पसारा होतो, आवरता आवरत नाही? ८ टिप्स, स्वयंपाकघर कायम चकाचक
बोरॅक्स पावडर
व्हिनेगर
या पद्धतीने करा उशा स्वच्छ
सर्वप्रथम, मशीनमध्ये उशा एकमेकांसमोर ठेवा, मशीन बंद करून त्यात पाणी भरा. मशीनमध्ये पाणी भरल्यानंतर त्यात लिक्विड साबण, बोरॅक्स पावडर व एक चमचा व्हिनेगर घालून ३० मिनिटांसाठी भिजत ठेवा. ३० मिनिटानंतर मशीन चालू करा, व १५ मिनिटांसाठी त्यात फिरवा. १५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढा व त्यात स्वच्छ पाणी घालून पुन्हा १० मिनिटांसाठी मशीन चालू करा.
डोअरमॅट कळकट - खराब झालेत? २ टिप्स, काही मिनिटात डोअरमॅट होईल क्लिन
१० मिनिटानंतर उशा बाहेर काढा, व स्वच्छ पाण्याने उशा धुवा. कडक उन्हामध्ये उशा सुकवण्यासाठी ठेवा. अशा प्रकारे बिना मेहनत घेता उशा स्वच्छ धुवून निघतील.