काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाळ्यात घराची कितीही स्वच्छता केली तरी, भिंतींना ओल धरणे, लादी चिकट होणे, अंथरूण- पांघरुणाला कुबट वास येणे या समस्या हमखास निर्माण होतातच. आता काही दिवसात घराघरात गणपती बाप्पांचं आगमन होईल. गणेश चतुर्थीच्या पूर्व तयारीत लोकं घराची साफ सफाई करतात.
मात्र, संपूर्ण घराची सफाई करून शेवटी उश्या आणि गादी स्वच्छ करायच्या राहून जातात. उश्या अस्वच्छ असल्या की, त्यातून कुजल्यासारखा वास येतो. व याची दुर्गंधी घरभर पसरते. उशी स्वच्छ करणे काही लोकांसाठी कठीण जाते. जर आपल्याला देखील उश्या न धुता, मेहनत न घेता स्वच्छ करायच्या असतील, तर ही ट्रिक नक्की वापरून पाहा. या एका ट्रिकमुळे न धुता उश्या स्वच्छ होतील(How to Clean Pillows and Keep Them Smelling Fresh with the use of Baking soda).
प्रेशर कुकर वापरताना विसरु नका ४ गोष्टी, चुकलं तर होईल कुकरचा स्फोट-जीवाला धोका
बेकिंग सोड्याचा करा असा वापर
बेकिंग सोडा फक्त जेवणासाठी वापरात येत नसून, त्याचा वापर घरातील इतर साहित्य स्वच्छ करण्यासाठीही होऊ शकतो. आपण बेकिंग सोड्याचा वापर करून उश्या स्वच्छ करू शकता. यासाठी मळकट झालेल्या उश्यांवर बेकिंग सोडा शिंपडा. १० मिनिटं बेकिंग सोडा तसंच उश्यांवर राहू द्या. १० मिनिटानंतर बेकिंग सोडा, ब्रशने रिमुव्ह करा. यामुळे कळकट झालेली उशी स्वच्छ होईल, व त्यातून दुर्गंधीही पसरणार नाही. जर उश्या अधिक कळकट झाल्या असतील तर, त्यांना धुवून स्वच्छ करा.
फ्रिजच्या डोअरवर रबर कळकट - चिकट झालाय, घाण साचली? ३ टिप्स, काही मिनिटांत फ्रिज चकाचक
व्हॅक्यूम क्लिनरचा करा वापर
उश्यांवर साचलेली धूळ काढण्यासाठी आपण व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करू शकता. याच्या मदतीने उश्या न धुता, काही मिनिटात स्वच्छ होतील. मात्र, व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करताना काळजीपूर्वक याचा वापर करावा. काही वेळेला उश्या खराब देखील होऊ शकतात. व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करून आपण गादी देखील स्वच्छ करू शकता.