Lokmat Sakhi >Social Viral > तांब्या पितळाची भांडी चुटकीसरशी चकाचक होतील; ४ ट्रिक्स, नवी कोरी दिसतील पुजेची भांडी

तांब्या पितळाची भांडी चुटकीसरशी चकाचक होतील; ४ ट्रिक्स, नवी कोरी दिसतील पुजेची भांडी

How to Clean Pital Utensils at Home : हा सोपा उपाय तुमचं काम अधिक सोपं करेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 03:47 PM2023-09-10T15:47:51+5:302023-09-10T23:48:14+5:30

How to Clean Pital Utensils at Home : हा सोपा उपाय तुमचं काम अधिक सोपं करेल.

How to Clean Pital Utensils at Home : What is a good cleaning hack pooja utensils cleaning hacks | तांब्या पितळाची भांडी चुटकीसरशी चकाचक होतील; ४ ट्रिक्स, नवी कोरी दिसतील पुजेची भांडी

तांब्या पितळाची भांडी चुटकीसरशी चकाचक होतील; ४ ट्रिक्स, नवी कोरी दिसतील पुजेची भांडी

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सण-उत्सवांच्या काळात तांब्या पितळाची भांडी स्वच्छ केली जातात. देवपूजेसाठी तांब्या-पितळाच्या भांड्याना खास महत्व असते.  खास प्रसंगाना ही भांडी आवर्जून वापरली जातात. पण तांब्याची भांडी स्वच्छ करायचं म्हणजे एक मोठं टेंशन असतं. साधा साबण आणि पाण्याने आपण ही भांडी स्वच्छ केली तर हे डाग निघत नाहीत आणि अधिकच खराब दिसू लागतात. देवाची भांडी स्वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहूया. (How to Clean Pital Utensils at Home)

सगळ्यात आधी एका भांड्यात ३ चमचे बेसनाचं पीठ घ्या. त्यात १ चमचा मीठ, ३ चमचे दही, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा घाला. हे मिश्रण हाताने किंवा ब्रशच्या साहाय्याने तांब्याच्या भांड्यावर लावा. ५ ते १० मिनिटं तसंच ठेवा.  नंतर टिश्यू पेपरने भांडं व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. नंतर तुम्ही पाण्याने स्वच्छ करू शकता. हा सोपा उपाय तुमचं काम अधिक सोपं करेल. (What is a good cleaning hack pooja utensils cleaning hacks)

बेकींग सोडा

पितळाची भांडी चमकवण्यासाठी तुम्ही बेकींग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी १ चमचा बेकींग सोडा घ्या. त्यात लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट पितळाच्या भांड्यांना आणि मूर्तींना लावून घाला. यानंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे पितळाच्या मूर्ती नव्यासारख्या चमकतील.

पंख्यावर धूळ साचलीये? हात न लावता स्वच्छ करा पंखा; 3 टिप्स, टेबल-खुर्ची न वापरता होईल स्वच्छ

व्हिनेगर

पितळाची भांडी, आणि मूर्तींचा काळेपणा दूर करण्यासाठी सगळ्यात आधी व्हिनेगरचा वापर करा. मीठाचा स्प्रे वापरून नंतर गरम पाण्यानं व्यवस्थित धुवा. यामुळे भांड्याचा काळेपणा दूर होईल.

चिंच

पितळाची भांडी चमकवण्यासाठी तुम्ही चिंचेच गर वापरू शकता. चिंच गरम पाण्यात काहीवेळा साठी भिजवून ठेवा. नंतर १५ मिनिटांनंतर चिंच व्यवस्थित स्मॅश करून पल्प काढून घ्या. पल्प स्क्रबप्रमाणे भांड्यांवर रगडा. यामुळे भांडी चमकण्यास मदत होईल. 

बेकींग सोड्याने चमकवा पितळाची भांडी

पितळाची भांडी चमकवण्यासाठी तुम्ही बेकींग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी १ चमचा बेकींग सोडा घ्या. त्यात लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट पितळाच्या भांड्यांना आणि मूर्तींना लावा. नंतर गरम पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने पितळाच्या मूर्ती नव्यासारख्या दिसू लागतील.

Web Title: How to Clean Pital Utensils at Home : What is a good cleaning hack pooja utensils cleaning hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.