बहुतांश घरांमध्ये सोफा, दिवाण अशा गोष्टी असल्या तरी प्लास्टिकच्या खुर्च्याही हमखास असतातच. कारण या खुर्च्या एकतर खूप मजबूत असतात आणि दुसरं म्हणजे जेव्हा त्यांची गरज नसते तेव्हा एकात एक रचून ठेवल्या की घराच्या एखाद्या छोट्याशा कोपऱ्यातही सहज मावून जातात. शिवाय पावसानेही त्या खराब होत नाही. त्यामुळे अंगणात, टेरेसमध्ये ठेवायलाही उत्तम असतात. आता तर प्लास्टिकच्या खुर्च्यांमध्येही अनेक आकर्षक पर्याय आले आहेत (How to clean plastic chairs or plastic furniture). रफ ॲण्ड टफ वापरामुळे मात्र या खुर्च्यांचा रंग काळवंडतो. किंवा त्यांच्यावर डाग पडतात (Home remedies to clean stains on plastic furniture). म्हणूनच आता अगदी कमी मेहनतीत झटपट या खुर्च्या कशा स्वच्छ करायच्या, ते पाहूया (Use of white vinegar to clean plastic chair)...
प्लास्टिकच्या खुर्च्या स्वच्छ करण्याचे उपाय
प्लास्टिकच्या खुर्च्या स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगर कसे उपयोगी पडते ते पाहणार आहोत.
बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या खुर्च्या स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा किंवा लिंबू असे पदार्थ वापरले तर या पदार्थातील घटकांची आणि प्लास्टिकची रिॲक्शन होते आणि खुर्च्यांवर डाग पडतात. असा कोणताही परिणाम व्हिनेगरच्या वापरामुळे होत नाही. त्यामुळे व्हिनेगरचा वापर कसा करायचा ते पाहूया. हे उपाय तुम्ही कोणत्याही प्लास्टिक फर्निचरच्या स्वच्छतेसाठी करू शकता.
१. प्लास्टिकच्या खुर्च्यांवरचे डाग काढण्यासाठी उपाय
खुर्च्यांवर किंवा इतर प्लास्टिकच्या फर्निचरवर डाग पडले असतील तर त्यासाठी आपल्याला थोडे स्ट्राँग मिश्रण वापरावे लागेल. यासाठी १ कप पाणी घ्या आणि त्यामध्ये पाऊण कप व्हिनेगर टाका.
तुम्ही पाहिलं का जगातलं सगळ्यात मोठं ग्रिल्ड चिज सॅण्डविच? पाहा त्याचं वजन किती आणि ते कोणी खाल्लं
हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून खुर्च्यांवर पडलेल्या डागांवर लावा. ७ ते ८ मिनिटांनी कपड्याने पुसून घ्या. डाग गेले नसतील तर पुन्हा त्यावर हे मिश्रण टाका.
२. खुर्च्या काळपट पडल्या असतील तर उपाय
खुर्च्यांवर कोणतेही डाग पडले नसतील, फक्त त्यांचा रंग वापरामुळे काळा पडला असेल तर अशा खुर्च्या स्वच्छ करण्यासाठी खूप स्ट्राँग मिश्रण करण्याची गरज नाही.
त्यासाठी १ लीटर पाण्यात अर्धा कप व्हाईट व्हिनेगर टाका आणि या पाण्याने खुर्च्या पुसून घ्या. काळपटपणा निघून जाईल आणि खुर्च्या नव्यासारख्या चमकतील.