Join us  

वरण-मसाल्यांचे डाग पडल्याने कुकरचं झाकण पिवळं पडलंय? ३ टिप्स, शिट्टी आणि झाकण होईल स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 5:12 PM

How To Clean Pressure Cooker मेहनत न करता झटकन काढा कुकरवरचे पिवळे डाग.

आजकाल प्रेशर कुकर हा स्वयंपाक घराचा प्रमुख भाग बनला आहे. प्रेशर कुकर प्रत्येक घरात वापरला जातो, त्यात जेवणही कमी मिनिटात शिजते. ज्यामुळे आपल्याला इतरही कामं करायला वेळ मिळतो. प्रेशर कुकरमध्ये भात - डाळ दोन्ही गोष्टी शिजवता येते. परंतु, काही वेळेस डाळ शिजवत असताना शिट्टीतून डाळ किंवा इतर मसाल्यांचे पाणी बाहेर येते. ज्यामुळे शिट्टी किंवा कुकरचं भांडं दोन्ही खराब होते.

प्रेशर कुकर वेळेवर साफ न केल्यास, हे डाग लवकर निघत नाही. ज्यामुळे प्रेशर कुकर साफ करणे देखील कठीण होऊन जाते. अशा स्थितीत प्रेशर कुकर हळू हळू पिवळट दिसू लागते. प्रेशर कुकर मेहनत न घेता स्वच्छ करायचं असेल तर, ३ टिप्स फॉलो करून पाहा. काही मिनिटात प्रेशर कुकर क्लिन होईल(How To Clean Pressure Cooker).

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि लिंबाच्या मदतीने प्रेशर कुकर लवकर क्लिन होईल. यासाठी बेकिंग सोडा आणि मीठ पूर्ण कुकरमध्ये टाका. व स्पंजच्या मदतीने संपूर्ण कुकर घासून काढा. असे केल्याने कुकरमधील मसाल्यांमुळे तयार झालेला पिवळटपणा निघून जाईल. यानंतर आपण डिशवॉशने संपूर्ण कुकर साफ करू शकता.

किचन नॅपकिन्स धुतले तरी कळकट-कडकच राहतात? ४ टिप्स- नॅपकिन होतील स्वच्छ

कांद्याची सालं

प्रेशर कुकर स्वच्छ करण्यासाठी आपण कांद्याच्या सालीचा वापर करू शकता. यासाठी कुकरमध्ये काही मिनिटे पाणी ठेवून कांद्याची साल किंवा कांद्याचे तुकडे उकळा. यानंतर स्पंजच्या मदतीने प्रेशर कुकर स्वच्छ करा. कांद्यामध्ये सल्फ्यूरिक ऍसिड असते. त्यामुळे प्रेशर कुकर स्वच्छ होण्यास मदत होते.

पावसाळ्यात घरात ट्यूबभोवती पाकोळ्या-किडे भिरभिरतात? ५ उपाय, किड्यांना न मारता ठेवा घराबाहेर

सैंधव मीठ

प्रेशर कुकर स्वच्छ करण्यासाठी आपण सेंधव मिठाचा वापर करू शकता. यासाठी कुकरमध्ये पाणी भरल्यानंतर त्यात एक चमचा सेंधव मीठ टाकून चांगले उकळा. यानंतर कुकर स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय केल्याने कुकर पूर्णपणे स्वच्छ होईल. 

टॅग्स :स्वच्छता टिप्सअन्नकिचन टिप्स