दिवाळीनिमित्त सध्या घरोघरी स्वच्छतेची कामं सुरू आहेत (Diwali 2024). एकेका खाेलीची स्वच्छता मोहिम हाती घेऊन अख्खं घर आवरून चकाचक केलं जातं. या साफसफाईमध्ये सगळ्यात अवघड स्वच्छता असते ती स्वयंपाक घराची (Diwali Cleaning Tips). कारण इतर खोल्यांच्या तुलनेत स्वयंपाक घरातच खूप जास्त पसारा ठेवलेला असतो. तो सगळा पसारा आवरणे हे खरंच अवघड काम आहे. शिवाय स्वयंपाक घरातल्या वस्तूंंची म्हणजेच गॅस, मायक्रोवेव्ह, फ्रिज यांचीही स्वच्छता करावीच लागते. आता फ्रिजच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्याच्यातल्या काचा काढून किंवा इतर कप्पे रिकामे करून आपण ते स्वच्छ करतो (Home Cleaning in Diwali). पण फ्रिजच्या दाराला जे रबर लावलेलं असतं ते कसं स्वच्छ करावं ते बऱ्याचदा लक्षात येत नाही (how to clean Refrigerator Door Gaskets?). म्हणूनच ही माहिती पाहा आणि अवघ्या काही मिनिटांत घरगुती साहित्य वापरून फ्रिज चकाचक करा..(easy tips and tricks to clean fridge)
फ्रिजच्या दाराचं रबर कसं स्वच्छ करावं?
फ्रिजच्या दरवाजाला लावलेलं रबर सोप्यात सोप्या पद्धतीने कसं स्वच्छ, चकाचक करावं, याविषयी माहिती सांगणारा एक छोटासा व्हिडिओ alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
दिवाळीसाठी किचनची साफसफाई कुठून सुरू करावी सुचत नाही? ५ टिप्स- स्वयंपाकघर चमकवा न दमता
फ्रिज स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी ते पुर्णपणे रिकामं करून घ्या आणि त्याचा स्विच बंद करा.
यानंतर एका वाटीमध्ये कोमट पाणी घ्या. त्याता १ टेबलस्पून डिशवाॅश लिक्विड आणि २ टेबलस्पून व्हिनेगर टाका.
सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आता हे मिश्रण फ्रिजच्या आतल्या भागात शिंपडा आणि स्पंजने अलगद घासून घ्या. त्यानंतर एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करून घ्या.
रोपांना महिन्यातून एकदा द्या 'हे' जादुई पाणी! बाग होईल हिरवीगार- विकतचं खत टाकण्याची गरजच नाही
आता फ्रिजचं रबर स्वच्छ करण्यासाठी सुरुवातीला एखाद्या टुथब्रशची मदत घ्या. टुथब्रश वापरून त्या रबरामधली साचलेली घाण काढून टाका.
त्यानंतर रबराच्या फटींमध्ये आपण तयार केलेलं मिश्रण शिंपडा. साधारण ५ ते ७ मिनिटे तसंच राहू द्या आणि त्यानंतर एखादा स्वच्छ, कोरडा सुती कपडा घेऊन ते पुसून घ्या. रबर अगदी चकाचक होईल.