Lokmat Sakhi >Social Viral > फ्रिजच्या दाराचं रबर स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक, काळपट झालेलं रबर १ मिनिटांत होईल चकाचक

फ्रिजच्या दाराचं रबर स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक, काळपट झालेलं रबर १ मिनिटांत होईल चकाचक

How To Clean Refrigerator Door Rubber: फ्रिजच्या दाराचं रबर काळपट झालं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2024 05:27 PM2024-06-06T17:27:28+5:302024-06-06T17:28:16+5:30

How To Clean Refrigerator Door Rubber: फ्रिजच्या दाराचं रबर काळपट झालं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..

how to clean refrigerator door rubber, simple and easy trick to clean refrigerator door rubber in marathi | फ्रिजच्या दाराचं रबर स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक, काळपट झालेलं रबर १ मिनिटांत होईल चकाचक

फ्रिजच्या दाराचं रबर स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक, काळपट झालेलं रबर १ मिनिटांत होईल चकाचक

Highlightsया रबरातल्या भेगांमध्ये खूप घाण अडकते आणि ते अक्षरश: काळपट होऊन जातं. ते कसं स्वच्छ करायचं ते पाहा..

फ्रिज ही बहुतांश घरातली रोजच्या वापरातली वस्तू.. उन्हाळ्याच्या दिवसांत तर फ्रिजशिवाय एखादा दिवस घालवणंही कठीण जातं. आपण एरवी आपल्या घराची, घराच्या वस्तूंची जशी स्वच्छता करतो, तशीच स्वच्छता फ्रिजचीही करावी लागते. फ्रिजच्या आतले शेल्फ, कप्पे आपण स्वच्छ करतो. पण जागा मात्र अस्वच्छ राहून जाते. आणि ती जागा म्हणजे फ्रिजच्या दाराला असणारं रबर. या रबरातल्या भेगांमध्ये खूप घाण अडकते आणि ते अक्षरश: काळपट होऊन जातं. ते कसं स्वच्छ करायचं ते पाहा.. (simple and easy trick to clean refrigerator door rubber injust 1 minute)

 

फ्रिजच्या दाराचं रबर स्वच्छ करण्याची ट्रिक

फ्रिजच्या दाराचं रबर कशा पद्धतीने स्वच्छ करायचं याचा एक सोपा उपाय world_of_chetana या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

देसीगर्ल प्रियांका चोप्राचा खास बॉडी स्क्रब- महागड्या बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट मिळेल फक्त १० रुपयांत

हा उपाय करण्यासाठी आपल्याला बेकिंग साेडा, डिशवॉश लिक्विड आणि व्हिनेगर किंवा लिंबू लागणार आहे.

सगळ्यात आधी तर एका वाटीमध्ये १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा डिशवॉश लिक्विड आणि अर्धा कप व्हिनेगर टाका. व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस टाकला तरी चालेल. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलूवन एकत्र करून घ्या.

 

आता घरातला एखादा जुना सॉक्स घ्या. त्याऐवजी एखादा जुना सुती कपडा किंवा रुमाल वापरला तरी चालेल. तो कपडा आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये टाकून ओला करा आणि कंगव्याच्या भोवती गुंंडाळा.

कोशिंबीर नेहमीच खातो, आता दाक्षिणात्य पद्धतीची 'कोसंबरी' खाऊन पाहा- घ्या खास रेसिपी 

आता रबराच्या मध्ये ज्या काही भेगा असतात, त्या भेगांमध्ये कंगवा टाका आणि पुढे- मागे या पद्धतीने हलवून तो भाग स्वच्छ करून घ्या. अशा पद्धतीने अगदी भराभर सगळं रबर स्वच्छ होऊन जाईल.

 

Web Title: how to clean refrigerator door rubber, simple and easy trick to clean refrigerator door rubber in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.