Lokmat Sakhi >Social Viral > इस्त्रीला काळपट- चॉकलेटी डाग पडले? २ सोप्या ट्रिक पाहा-  एका मिनिटांत इस्त्री नव्यासारखी दिसेल

इस्त्रीला काळपट- चॉकलेटी डाग पडले? २ सोप्या ट्रिक पाहा-  एका मिनिटांत इस्त्री नव्यासारखी दिसेल

How To Clean Iron Surface: इस्त्रीला कपडे जळाल्याचे काळपट, चॉकलेटी डाग पडले असतील तर ते अगदी काही मिनिटांतच कसे स्वच्छ करायचे पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2024 04:10 PM2024-05-01T16:10:41+5:302024-05-01T16:11:21+5:30

How To Clean Iron Surface: इस्त्रीला कपडे जळाल्याचे काळपट, चॉकलेटी डाग पडले असतील तर ते अगदी काही मिनिटांतच कसे स्वच्छ करायचे पाहा...

How to clean rust, stains of burnt clothes on the surface of press, how to clean iron surface | इस्त्रीला काळपट- चॉकलेटी डाग पडले? २ सोप्या ट्रिक पाहा-  एका मिनिटांत इस्त्री नव्यासारखी दिसेल

इस्त्रीला काळपट- चॉकलेटी डाग पडले? २ सोप्या ट्रिक पाहा-  एका मिनिटांत इस्त्री नव्यासारखी दिसेल

Highlights डाग पडलेल्या इस्त्रीने कपडे व्यवस्थित प्रेस होत नाहीत. त्यामुळेच हे अगदी साधे- सोपे उपाय पाहून घ्या.

इस्त्री ही आपल्या घरातली अगदी रोज नसली तरी दर दोन- तीन दिवसांआड लागणारी वस्तू आहे. कपडे आपण इस्त्रीसाठी बाहेर देत असलो तरी कधीतरी अशी वेळ येतेच की आपल्याला कपड्यांवरून इस्त्री फिरवून घ्यावी लागते. पण कधी कधी कपडा जळतो किंवा कपड्याच्या आजुबाजूला असलेल्या एखाद्या वस्तूवरून चुकून इस्त्री फिरवली गेली तर ती वस्तू जळते आणि तिचा डाग इस्त्रीवर पडतो. अशा डाग पडलेल्या इस्त्रीने कपडे व्यवस्थित प्रेस होत नाहीत (How to clean rust, stains of burnt clothes on the surface of press). त्यामुळेच हे अगदी साधे- सोपे उपाय पाहून घ्या. यामुळे इस्त्री अगदी काही मिनिटांतच नव्यासारखी स्वच्छ होऊन जाईल. (how to clean iron surface?)

इस्त्रीवर पडलेले डाग काढून टाकण्याचे उपाय

 

१. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

इस्त्रीवर पडलेले जळकट डाग काढून टाकण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो. शिवाय तो करायलाही खूप सोपा आहे. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये व्हिनेगर घ्या. त्यात थोडा बेकिंग सोडा टाका.

फक्त पैठणीच नाही तर 'या' हॅण्डलूम साड्याही महाराष्ट्रात तयार होतात, तुमच्या कलेक्शनमध्ये त्या आहेत?

आता हे मिश्रण इस्त्रीवर ज्या ठिकाणी डाग पडले आहेत, तिथे कापसाने चोळून लावा. डाग लगेचच फिकट होऊ लागतील. डाग पुर्णपणे निघून जाईपर्यंत हा उपाय करा. इस्त्री काही मिनिटांतच चकाचक होईल.

 

२. पॅरासेटीमॉल टॅबलेट्स

पॅरासेटीमॉल या औषधी गोळीचा उपयोग इस्त्री स्वच्छ करण्यासाठी करता येतो. त्यासाठी सुरुवातीला प्लगचे बटन सुरू करून इस्त्री थोडी कोमट करा आणि नंतर बटन बंद करा.

परिणीती चोप्रा म्हणते मी सर्वसामान्य घरातली आहे, त्यामुळे तेव्हा माझ्याकडे एवढेही पैसे नसायचे की.... 

आता कोमट झालेल्या इस्त्रीवर जिथे डाग पडला आहे, त्याठिकाणी पॅरासेटीमॉलची गोळी घासा. त्यानंतर स्वच्छ ओलसर कपड्याने पुसून घ्या. डाग निघून जाईल. डाग निघाला नाही तर हा उपाय पुन्हा करा. इस्त्री स्वच्छ होऊन जाईल. 

 

Web Title: How to clean rust, stains of burnt clothes on the surface of press, how to clean iron surface

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.