शॉवरचा वापर जवळपास सगळेच जण करतात. काही जण अगदी रोजच्यारोज शाॅवर वापरतात तर काही जण अधूनमधून त्याचा वापर करतात. हल्ली सगळीकडेच बोअरवेलचे पाणी आहे. या पाण्यात जास्त क्षार असतात. हे क्षार शॉवरच्या छिद्रांमध्ये अडकतात आणि ती छिद्रे ब्लॉक होऊन जातात. त्यामुळे मग शॉवर सुरू केलं तरी त्याचा हवा तसा फवारा अंगावर येत नाही. त्यामुळेच ही छिद्रे वेळोवेळी स्वच्छ करण्याची गरज असते. आता शॉवर हेड स्वच्छ करण्याचा एक खास उपाय आपण पाहणार आहोत (how to clean shower head?). यामध्ये ब्रश हातात न घेताही तुमचं शॉवर एका रात्रीतून अगदी चकाचक होऊन जाईल (Home Hacks To Clean Shower Head). त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा..(most easy and simple method of cleaning shower head without using brush)
शॉवर हेड स्वच्छ करण्याचा उपाय
शॉवर हेड कमीतकमी मेहनतीमध्ये कसं स्वच्छ करावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
चुडी खनकेगी..!! लग्नसराईत घालण्यासाठी बांगड्यांचे एकदम लेटेस्ट पॅटर्न, हात दिसतील सुंदर- मोहक
हा उपाय करण्यासाठी आपल्याला व्हिनेगर, लिंबू, बेकिंग सोडा, प्लास्टिकची पिशवी आणि एक छोटीशी दोरी अशा काही मोजक्या वस्तू लागणार आहेत.
सगळ्यात आधी तर प्लास्टिकची बॅग घ्या. त्या बॅगला एखादे छिद्र तर नाही ना हे एकदा तपासून घ्या जेणेकरून त्यातून पाणी गळणार नाही.
आता या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा व्हिनेगर आणि एका लिंबाचा रस घाला. आता ही पिशवी तुमच्या शॉवर हेडला बांधून टाका.
दही की ताक? तुमच्या आरोग्यासाठी दोन्हीपैकी अधिक चांगलं काय? बघा कसं ओळखायचं...
यानंतर शॉवर सुरू करा आणि पिशवीमध्ये एवढं पाणी भरा की शॉवर हेड पुर्णपणे त्यात बुडेल. आता रात्रभर ही पिशवी याच पद्धतीने शॉवर हेडला बांधलेली असू द्या. सकाळी जेव्हा तुम्ही ती पिशवी काढून पाहाल तेव्हा छिद्रांमध्ये अडकलेली घाण तर निघालेलीच असेल पण शॉवरही अगदी स्वच्छ झालेलं दिसेल, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. उपाय अगदी सोपा आहे. त्यामुळे एकदा करून पाहायला हरकत नाही.