महिलावर्गाला सोन्याचे आणि चांदीचे दागिने फार आवडतात (Cleaning Tips). सोनं-चांदीमुळे महिलांच्या सौंदर्यात भर पडते. पैंजण, कानातले, बाजूबंद, हार, जोडवी अशा विविध प्रकारचे दागिने बाजारात मिळतात. महिलांच्या कोमल पायांवर चांदीचे पैजण खूप सुंदर दिसतात. छम - छम करत जाणाऱ्या पायांवर सर्वांच्याच नजरा पडतात (Silver Items). पण पैंजण लवकर काळपट पडतात.
चांदीच्या दागिन्यांवरची चमक पुन्हा आणण्यासाठी, आपण दागिन्यांना ज्वेलरी शॉपमध्ये देतो. चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी सराफ बरेच पैसे घेतात. पण सराफाला पैसे न देता चांदीचे दागिने स्वच्छ करायच्या असतील तर, एक जबरदस्त ट्रिकचा वापर करून पाहा. या ट्रिकमुळे काही मिनिटात चांदीचे दागिने स्वच्छ होतील, शिवाय नव्यासारखे चमकतील(How to Clean Silver items at home).
चांदीचे दागिने चमकवण्यासाठी लागणारं साहित्य
अॅल्युमिनियम फॉइल
मीठ
बेकिंग सोडा
हृदयद्रावक! त्वचेचा सावळा रंग दीड वर्षाच्या मुलीच्या जीवाशी; वडिलांनी दिलं विष कारण..
डिटर्जंट पावडर
पाणी
अशा पद्धतीने करा चांदीचे दागिने स्वच्छ
सर्वप्रथम, अॅल्युमिनियम फॉइल घ्या. त्याचे चार चौकोनी भाग करून घ्या. एकीकडे भांड्यात दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात अॅल्युमिनियम फॉइलच्या चार तुकड्यांचे गोळे घाला. चमच्या मदतीने त्या गोळ्यांना पाण्यात बुडवून ठेवा.
तळल्यावर पुऱ्या तेलकट होतात? पीठ भिजवताना घाला १ पांढरा पदार्थ, पुऱ्या तेलकट होणारच नाहीत
आता त्यात चांदीचे दागिने घालून गॅस हाय फ्लेमवर ठेवा, पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर, आपल्याला थोड्या वेळानंतर दिसून येईल की, अॅल्युमिनियम फॉइल काळपट पडला असेल. ५ मिनिटानंतर त्यात अर्धा चमचा मीठ. एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा डिटर्जंट पावडर घालून मिक्स करा. आता मिडीयम गॅसवर पाणी उकळवत ठेवा. १० मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करा.
पाणी थंड झाल्यानंतर चांदीचे दागिने बाहेर काढून स्वच्छ पाण्यात ठेवा, आणि धुवून घ्या. अशा प्रकारे काळपट पडलेले चांदीचे दागिने न घासता स्वच्छ होतील.