Lokmat Sakhi >Social Viral > चमचाभर टूथपेस्टने चमकतील छुमछुम करणारे पैंजण; पाहा वापर कसा करायचा..

चमचाभर टूथपेस्टने चमकतील छुमछुम करणारे पैंजण; पाहा वापर कसा करायचा..

How To Clean Silver Jewellery with Toothpaste : सराफाकडे न जाता, घरातच पैंजण चमकवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 10:00 AM2024-05-13T10:00:00+5:302024-05-13T10:00:02+5:30

How To Clean Silver Jewellery with Toothpaste : सराफाकडे न जाता, घरातच पैंजण चमकवा..

How To Clean Silver Jewellery with Toothpaste | चमचाभर टूथपेस्टने चमकतील छुमछुम करणारे पैंजण; पाहा वापर कसा करायचा..

चमचाभर टूथपेस्टने चमकतील छुमछुम करणारे पैंजण; पाहा वापर कसा करायचा..

सणावाराच्या दिवसात आपण पारंपारिक पोशाखावर ट्रेडीशनल कपडे परिधान करतो (Cleaning Tips). ट्रेडीशनल कपड्यांवर ट्रेडीशनल ज्वेलरी शोभून दिसतात. सोन्याचा हार, बांगड्या, बाजूबंद, यासह चांदीचे पैंजण ट्रेडीशनल कपड्यांवर उठून दिसतात (Silver Ornaments). काही मुली किंवा महिला दररोज पैंजण परिधान करतात. छम-छम करणारे पैंजण प्रत्येकीला आवडतात. पण रोजच्या वापरामुळे ते लवकर काळे पडतात. पाण्यामुळे किंवा इतर कारणांमुळे चांदीचे पैंजण लगेच काळवंडतात. काळपट पडलेले पैंजण दिसायला खूप खराब दिसतात.

पैंजण स्वच्छ करण्यासाठी आपण सराफाकडे देतो. त्यात खूप खर्चही होतो. जर आपल्याला सराफाकडे न देता, घरीच पैंजण स्वच्छ करायच्या असतील तर, चमचाभर टूथपेस्टचा वापर करा. सराफाकडे न जाता, आपण घरातच पैंजण चमकवू शकता(How To Clean Silver Jewellery with Toothpaste).

घरातच पैंजण चमकवण्याची सोपी ट्रिक

सर्वप्रथम, भांडं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक ग्लास पाणी ओता. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चांदीचे पैंजण घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात एक चमचा टूथपेस्ट घालून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा चहापत्ती, डिटर्जेंट पावडर घालून मिक्स करा.

स्वयंपाकात वापरा '१' हेल्दी तेल! उच्च रक्तदाब - वजन वाढ - हार्ट अॅटॅक येण्याची भीती कमी-आरोग्यही निरोगी राहील..

५ मिनिटानंतर गॅस बंद करा. भांडं खाली ठेवा, त्यातून पैंजण बाहेर काढा. टूथब्रशने पैंजण घासा, व पाण्याने धुवून काढा. या ट्रिकमुळे काही मिनिटात पैंजण स्वच्छ होईल.

बेकिंग सोडा

रोज फोडणीचा भात कशाला? भात उरला तर करा भाताचा ढोकळा झटपट; नाश्ता स्पेशल खास रेसिपी

बेकिंग सोड्याचा वापर फक्त पदार्थात करण्यात येत नसून, चांदीचे पैंजण चमकवण्यासाठीही होऊ शकतो. यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चांदीच्या पैंजणावर लावा. काही वेळानंतर ब्रशने पैंजण घासून काढा, मग पाण्याने धुवा. या ट्रिकमुळे पैंजणावरील काळपट डाग सहज निघून जातील.

Web Title: How To Clean Silver Jewellery with Toothpaste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.