Join us  

मुलांच्या युनिफॉर्मचे पांढरे मोजे मळकट-काळेकुट्ट झालेत? ५ सोपे हॅक्स, नव्यासारखे पांढरेशुभ्र दिसतील सॉक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 2:04 PM

How to Clean Socks Properly : मोजे साफ  करण्यसाठी तासनतास घालवायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी  वेळात वेळात मोजे स्वच्छ करू शकता. 

घरात भरपूर सॉक्स अस्वच्छ सॉक्स पडले आहेत आणि ते साफ करणं तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही काही सोपे  हॅक्स वापरून मळलेले सॉक्स पुन्हा नव्यासारखे चमकवू शकता. (Home Cleaning Hacks) व्हाईट व्हिनेगर, बेकिंग सोडा, हायड्रोजन परोक्साईड आणि लिंबाचा रस मोजे स्वच्छ करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. (Cleaning Hacks) मोजे साफ  करण्यासाठी तासनतास घासायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी  वेळात वेळात मोजे स्वच्छ करू शकता. (  How to Get Whie Socks White Again With Home Remedies)

1) एका मगमध्ये पाणी घेऊन त्यात बेकिंग सोडा मिसळा (Baking Soda Cleaning Soda) आणि या मिश्रणात  मोजे  २ तासांसाठी भिजवून ठेवा. २ तासांनी मोजे गरम पाण्याने स्वच्छ करा.  या उपायाने पांढरे मोजे चमकदार दिसतील. 

2) व्हिनेगर गरम पाण्यात मिसळा. या मिश्रणाने मोजे स्वच्छ करा. काही वेळाने मोजे पाण्यातून बाहेर काढा. या उपायाने मोजे पांढरेशुभ्र चमकदार दिसू लागतील.  पांढरे मोजे धुण्यासााठी नॉर्मल डिटर्जेंटचा वापर करू नका.  चांगल्या प्रतिच्या डिटर्जेंटचा वापर करून मोजे स्वच्छ करा. मोजे जास्त खराब झाले असतील तर २ दिवसांपेक्षा जास्त  दिवस मोजे घालू देऊ नका. मोजे रोजच्या रोज स्वच्छ  करणं गरजेचं आहे. 

3) एका पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात ४ चमचे ब्लिच मिसळा आणि त्यानंतर १ चमचा डिश सोप घ्या. त्यात मोजे घालून २० मिनिटांपर्यंत भिजवून  ठेवा. नंतर साध्या पाण्याने धुवून घ्या. 

वयाची तिशी गाठताच 'हे' 5 पदार्थ खाणं सुरू करा; म्हातारपणातही हाडं मजबूत राहतील-फिट राहाल

4)  डिशवॉशर मोज्यांची चमक परत आणण्यासाठी फायदेशीर ठरते.  गरम पाणी घालून त्यात डिशवॉशर डिटर्जेंट टॅब्लेट घाला. रात्रभर तसंच भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी मोजे स्वच्छ धुवून घ्या. डिटर्जेंट टॅब घातल्यानंतर मोजे स्वच्छ धुवून घ्या आणि रात्रभर भिजवून ठेवा. नंतर सकाळी मोजे धुवून घ्या. 

5) बोरेक्स पावडर सामान्य कपड्यांच्या डिटर्जेंटप्रमाणेच परिणामकारक ठरते. यामुळे डाग दूर होतात. गरम पाणी डिटर्जेंट आणि बोरेक्स पावडर मिसळून घ्या. यात तुम्ही  घाणेरडे सॉक्स ३० मिनिटांसाठी भिजवून ठेवा. त्यानंतर  सॉफ्ट ब्रशने धुवून घ्या. 

वाटीभर पोह्यांचा खमंग नाश्ता घरी करा; ५ मिनिटांत बनतील ब्रेड पोहा रिंग; घ्या सोपी रेसिपी

6) अमोनिया एक लॉन्ड्री एक्टिव्ह आहे. ज्यामुळे डाग दूर होतात आणि ग्रीस  निघून जाते. पॉलिएस्टर, नायलॉन आणि कपड्यांवरचे जिद्दी डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. २ चमचे डिश, २ चमचा अमोनिया,  २ चमच बेकिंग सोडा, २ कप गरम पाणी मिसळून सॉक्स ३० मिनिटांसाठी तसंच ठेवा नंतर धुवून घ्या.

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडी