प्रत्येकाच्याच घरी हॉलमध्ये सोफासेट असतोच. टिव्ही पाहण्यासाठी, आराम करण्यासाठी, तासनतास मोबाईल वापरण्यासाठी लोक सोफ्यावर बसलेले असतात. (Simple Ways to Clean a Sofa) तर काही महिला लसूण सोलताना, भाज्या चिरतानाही सोफ्यावर बसणं पसंत करतात. खाण्यापिण्याच्या पदार्थांचे डाग, नेलपेंट्सचे, पाण्याचे डाग सोफ्यावर तसेच राहतात. (How to clean sofa at home)
सोफ्याचे कव्हर वेळीच धुतले गेले नाही तर हे डाग जास्त हट्टी होतात आणि निघता निघत नाही. कोणीही घरात आल्यानंतर सोफे या स्थितीत दिसले तर वाईट इंप्रेशन पडू शकतं. तुम्ही घराची स्वच्छता व्यवस्थित करत नाही असा त्याचा अर्थ होतो. सोफे स्वच्छ करण्याच्या सोप्या टिप्स पाहूया. (What is the best way to clean my fabric sofa) फक्त ३० रूपयांचा बेकींग सोडा वापरून तुम्ही सोफा स्वच्छ करू शकता.
एका भांड्याच स्वच्छ पाणी घेऊन त्यात १ चमचा बेकींग सोडा घाला. १ चमचा डेटॉल लिक्विड घालून हे मिश्रण एकत्र करा. पाणी हे मिश्रण एकत्र झाल्यानंतर एक स्वच्छ कापड त्या पाण्यात बुडवा तुम्ही जाड नॅपकिनचा वापर करू शकता. नॅपकवर एका भांड्याचं झाकण ठेवून नॅपकीनने बंद आणि या नॅपकिनच्या साहाय्यानं सोफ्याचे कव्हर स्वच्छ करा.
सोफा स्वच्छ करण्याचे उपाय
१) सोफा कोणताही असो, प्रत्येक सोफा स्वच्छ करण्याची पहिली पायरी म्हणजे व्हॅक्यूम क्लिनर. याच्या मदतीने सोफ्याच्या तळापर्यंत साचलेली धूळ आणि माती अगदी सहज साफ होते. म्हणून, व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने, प्रथम सोफाच्या प्रत्येक भागातून साचलेली धूळ काढून टाका.
अंगात रक्त कमी झालंय? ५ व्हेज पदार्थ रोज खा, हिमोग्लोबिन वाढेल; तब्येत राहील ठणठणीत
२) साफ केल्यानंतर, सोफा वापरण्यापूर्वी तो पूर्णपणे कोरडा होऊ द्या. ओल्या सोफ्यावर मोल्ड होण्याचा धोका असतो. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही तज्ज्ञांच्या मदतीशिवाय तुमचा सोफा सेट स्वतः स्वच्छ करू शकता आणि पैसे वाचवू शकता.
उन्हाळ्यात रोज दही खाताय? 3 त्रास असतील तर चुकूनही दही खाऊ नका, तब्येत सांभाळा
३) फॅब्रिक सोफा साफ करणे थोडे कठीण आहे तुम्ही सर्फमध्ये एक वाटी कोमट पाणी घाला आणि त्यात दोन चमचे अमोनिया घाला आणि ते चांगले मिसळा. आता हे मिश्रण सोफ्याच्या ज्या भागांवर डाग आहेत त्यावर लावा. नंतर कोमट पाण्यात भिजवलेला स्पंज पिळून घ्या आणि ज्या ठिकाणी तुम्ही मिश्रण लावले आहे ते स्वच्छ करा.