Lokmat Sakhi >Social Viral > सोफ्याचे कव्हर न काढताच १ सोपी ट्रिक वापरुन झटपट करा सोफा कव्हर स्वच्छ...सोफा दिसेल नव्यासारखा...

सोफ्याचे कव्हर न काढताच १ सोपी ट्रिक वापरुन झटपट करा सोफा कव्हर स्वच्छ...सोफा दिसेल नव्यासारखा...

How to clean sofa at home : घरातील जुने, मळलेले सोफे स्वच्छ करायचेत ? वापरा एक सोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 07:00 PM2023-09-21T19:00:55+5:302023-09-21T19:13:49+5:30

How to clean sofa at home : घरातील जुने, मळलेले सोफे स्वच्छ करायचेत ? वापरा एक सोपी ट्रिक...

How to clean sofa at home, How To Clean a Fabric Couch and Sofa | सोफ्याचे कव्हर न काढताच १ सोपी ट्रिक वापरुन झटपट करा सोफा कव्हर स्वच्छ...सोफा दिसेल नव्यासारखा...

सोफ्याचे कव्हर न काढताच १ सोपी ट्रिक वापरुन झटपट करा सोफा कव्हर स्वच्छ...सोफा दिसेल नव्यासारखा...

घरात एखादा खास प्रसंग असला किंवा सण समारंभ असेल तर आधीच आपण सगळ्या घराची सफाई करतो. सगळ्या वस्तूंची साफ सफाई करताना आपल्या हॉल किंवा बेडरुममध्ये असणाऱ्या सोफ्याची नेमकी स्वच्छता कशी करावी असा प्रश्न आपल्याला पडतो. बहुतेकवेळा आपण टीव्ही पाहण्यासाठी, मोबाईवर टाईमपास करण्यासाठी, झोपून आराम करण्यासाठी या सोफ्याचा वापर करतो. घरांतील अशी अनेक छोटी - मोठी काम असतात जी आपण सोफ्यावर बसून करतो. अशी काम सोफ्यावर बसून करताना आपल्या हातून काहीतरी सोफ्यावर पडल्यावर त्याचे घाणेरडे डाग सोफ्यावर दिसू लागतात. काहीवेळा खाण्यापिण्याचे पदार्थ, तेल, नेलपेंट असे अनेक हट्टी (How to clean sofa at home) डाग सोफ्यावर पडतात. या पडलेल्या डागांमुळे सोफ्याचे कव्हर खूपच खराब दिसू लागते(Simple Ways to Clean a Sofa).

सोफ्याचे कव्हर वेळीच धुतले गेले नाही तर हे डाग जास्त हट्टी होतात आणि  निघता निघत नाही. असे हट्टी डाग पडलेले सोफ्याचे कव्हर स्वच्छ करणे खूप मोठा टास्कच असतो. सोफ्याचे कव्हर काढून ते स्वच्छ धुणे, व्यवस्थित वाळवणे, वाळल्यानंतर ते पुन्हा सोफ्यावर घालणे एवढा मोठा घाट घालावा लागतो. परंतु आपण एक सोपी ट्रिक (Amazing Trick to Remove Stains From Sofas) वापरुन झटपट सोफ्याचे कव्हर स्वच्छ  (What is the best way to clean my fabric sofa) करु शकतो. या ट्रिकचा वापर करून आपण सोफ्याचे कव्हर न काढताच अतिशय कमी वेळात चटकन सोफ्याचे कव्हर स्वच्छ करु शकतो(How to Clean a Fabric Sofa At Home).

सोफ्याचे कव्हर स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक... 

१. एका भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून लिक्विड सोप घालून हे मिश्रण एकत्र करा. पाणी हे मिश्रण एकत्र झाल्यानंतर एक स्वच्छ कापड त्या पाण्यात बुडवा, आपण जाड नॅपकिनचा देखील वापर करू शकता. आता एक मोठी वाटी किंवा बाऊल घेऊन, मग कापड अंथरुन या कापडावर बाऊल उलट ठेवून द्यावा. मग त्या टॉवेलने संपूर्ण बाऊल झाकून घेऊन नॅपकिनचे टोक रबर लावून बंद करुन घ्यावे. आता याच्या मदतीने आपण सोफ्याचे कव्हर न काढताच झटपट स्वच्छ करु शकतो. 

कुकरची शिटी स्वच्छ कशी करायची ? काचेच्या बाटलीवरचे स्टिकर कसे काढायचे ? घ्या एकदम सोपे झटपट उपाय...

किचनमधली वेळखाऊ कामे होतील सोपी, ३ ट्रिक्स - कामे आटोपतील भरभर, टेंशन कमी...

कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

सोफा स्वच्छ करण्याचे उपाय... 

१. स्टिम वॉशची मदत घ्या :- आपण स्टीम वॉशच्या मदतीने सोफा कुशन साफ ​​करू शकता.  महागडी कुशन टॅगसह येतात, टॅगवर दिलेल्या सूचनांनुसार साफ करता येतात. अशावेळी फॅब्रिक लक्षात घेऊन स्टीम वॉश करा, तसेच टॅगवर दिलेली खबरदारी घ्या. यामुळे सोफा कुशन पूर्वीप्रमाणे चमकेल  आणि लवकर खराब होणार नाही.   

२. उन्हांत ठेवा :- कुशन्स रोज साफ करता येत नाहीत. पण जर रोज २ तास उन्हात ठेवाल तर  कुशन्स स्वच्छ होऊ शकतात. त्यावरची धूळ माती सहज निघून जाते. याशिवाय कुशन्सवरील लहान लहान बॅक्टेरियासुद्धा नष्ट होतील. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे  सोफा कुशन साफ ​​करण्यासाठी या सर्व टिप्स वापरू शकता.

३. दुर्गंधी येत असेल तर :- जर तुमच्या सोफा कुशनला दुर्गंधी येत असेल तर ती साफ करण्यापूर्वी स्प्रे करून घ्या. एका स्प्रे बॉटलमध्ये बेकिंग पावडर आणि लिंबाच्या सालीच्या पावडरचे लिक्विड तयार करा. आता उशीवर फवारणी करा, त्यामुळे वास कमी होईल. उशीचे फॅब्रिक खूप मऊ असते, म्हणून ते धुण्याऐवजी ड्राय क्लिन करून घ्या. या व्यतिरिक्त, आपण इच्छित असल्यास, आपण व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने देखील स्वच्छ करू शकता.

Web Title: How to clean sofa at home, How To Clean a Fabric Couch and Sofa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.