घरातला सोफा वारंवार वापरल्यामुळे खराब होऊ लागतो. सोफा खराब असेल तर संपूर्ण घर स्वच्छ दिसतं घरात लहान मुलं असतील तर सोफ्यावर वेगवेगळे डाग लागत असतात. सोफा साफ करणं काही सोपं काम नाही. अनेक लोक सोफा स्वच्छ करण्यसाठी बाहेरून लोकांना बोलवतात. (Cleaning Tips) पण पैसे खर्च न करता घरच्याघरी तुम्ही सोफा स्वच्छ करू शकता. सोफा साफ करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करून पाहिल्यास कामही सोपं होईल. (Sofa Cleaning Tips Easy Hacks To Clean Sofa At Home)
वॅक्यूम क्लिनरची मदत घ्या
गुड हाऊसकिपिंगच्या रिपोर्ट वॉटर बेस्ड क्लिनर्सचा वापर करा. सोफा स्वच्छ कोरडा झाल्यानंतर GH सील स्टार टाईट एंटी बॅक्टेरिअल फॅब्रिक स्प्रे यांसारख्या उत्पादनांचा वापर करा. जर तुमच्याघरी लहान मुलं असतील आणि त्यांना सोफ्यावर बसून जेवायची सवय असेल तर सोफा लवकर खराब होऊ शकतो. छोट्या छोट्या वस्तू सोफ्यावर पडतात. अशा स्थितीत सोफा साफ करण्यासाठी तुम्ही वॅक्यूम क्लिनरचा वापर करू शकता. हा सगळ्यात चांगला उपाय आहे. वॅक्यूम क्लिनरमुळे धूळ, घाण जमा होत नाही आणि सोफा क्लिन राहतो. वॅक्यूम क्लिनर तुम्हाला ऑनलाईन किंवा बाजारातील दुकानात सहज उपलब्ध होईल.
कापडाने सोफा स्वच्छ करा
सोफा नियमित कापडाने साफ करण्याची सवय ठेवा. यासाठी सगळ्यात आधी २ ते ३ कप गरम पाणी घ्या. यात एक चमचा लिक्विड डिश वॉशिंग सोप मिसळा. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. स्पंज आणि मऊ कपडाने सोफा साफ करून हलक्या हाताने रगडून स्वच्छ करा.
कढईच्या झाकणाचा वापर करा
सोफा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कढईच्या झाकणाचा वापर करू शकता. सगळ्यात आधी झाकण बांधता येईल इतका मोठा डस्टिंगचा रूमाल सोफ्यावर ठेवा. त्यावर झाकण ठेवून वरच्या बाजूने बांधून घ्या. कापडात बांधलेल्या झाकणाने सोफा स्वच्छ करून घ्या. झाकण सोफ्याच्या सर्व कोपऱ्यावर फिरवा नंतर झाकणाला बांधलेलं कापड काढा. यावर तुम्हाला धूळ लागलेली दिसून येईल.