Join us  

पांढऱ्या कपड्यांवरचे हट्टी डाग घालवण्याचे ३ सोपे उपाय, कपडे दिसतील पांढरे शुभ्र, नव्यासारखे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2024 9:20 AM

How to clean stain on white clothes : हे डाग इतके हट्टी असतात की ते हाताने, साध्या साबणाने घासूनही निघत नाहीत.

प्रजासत्ताक दिनाला आपण झेंडावंदन करायला जातो. यावेळी आपण साधारणपणे पांढरे कपडे घालतो. पांढरी साडी, कुर्ता, पंजाबी ड्रेस किंवा पुरुष पांढरा शर्ट, पांढरा कुर्ता आणि सलवार असे कपडे घालतात. पण यावेळी माती, गुलाल किंवा आणखी काही लागून कपडे खराब होतात. हेच कपडे घालून आपण चहा प्यायला किंवा खायला गेलो तर त्याचेही डाग कपड्यावर पडतात आणि मग पांढरे कपडे खराब होतात. असे कपडे थेट वॉशिंग मशीनला लावले तरी त्याचे डाग निघत नाहीत. अशावेळी हे पांढरे कपडे हातानेच घासावे लागतात, अनेकदा हे डाग इतके हट्टी असतात की ते हाताने, साध्या साबणाने घासूनही निघत नाहीत. अशावेळी पांढरे कपडे स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक वापरल्यास हे कपडे स्वच्छ होण्यास मदत होते. या ट्रिक कोणत्या आणि त्या कशा वापरायच्या पाहूया(How to clean stain on white clothes). ...

१. पांढरे कपडे एका बादलीत किंवा टबमध्ये गरम पाण्यात भिजत घाला. यामध्ये पाव कप हायड्रोजन पॅरॉक्साईड घाला.२ चमचे बेकींग सोडा घातला तर कपड्यांचा कुबट वास जाण्यास मदत होईल. पण तेलाचे डाग असतील तर सोड्याच्या ऐवजी भांड्याचा लिक्विड साबण घाला. तासभर कपडे पाण्यात भिजवून मग घासून धुवून टाका. 

(Image : Google)

२. पांढऱ्या कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी आपण लिंबाच्या रसाचा वापर करु शकता. लिंबू साधारणपणे आपल्या घरात असते किंवा बाजारातही अगदी स्वस्तात उपलब्ध होते. यासाठी ज्याठिकाणी डाग पडला आहे त्या भागावर लिंबू डाग 3-5 मिनिटे घासायचे. त्यानंतर आपण कपडा ज्यापद्धतीने खळबळतो तसा धुवून टाकायचा. या पद्धतीने साधारणपणे सर्वप्रकारचे डाग सहज निघून जाण्यास मदत होते.

३. बाजारात विविध कंपन्यांचे ब्लीच उपलब्ध असतात. या ब्लीचने पांढऱ्या कपड्यांवरचे डाग सहज निघण्यास मदत होते. कोमट पाण्यात साधारण २ चमचे ब्लीच घालून पांढरे कपडे त्यात तासभर भिजवायचे. नंतर थोडा साबण लावून ब्रशने कपडे घासल्यास कपड्यांवरचे डाग निघून जाण्यास मदत होते. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी