Lokmat Sakhi >Social Viral > स्टील-प्लास्टिकच्या बादल्यांवर मेणचट, खाऱ्या पाण्याचे डाग पडलेत? बेकिंग सोड्याचा एक सोपा उपाय, काही मिनिटात बादल्या चकाचक

स्टील-प्लास्टिकच्या बादल्यांवर मेणचट, खाऱ्या पाण्याचे डाग पडलेत? बेकिंग सोड्याचा एक सोपा उपाय, काही मिनिटात बादल्या चकाचक

How to clean a stainless-steel and plastic buckets with the use of Baking soda : नव्या बादल्या डागांमुळे जुन्या दिसत असतील तर, २ चमचे बेकिंग सोड्याचा एक सोपा उपाय करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2023 12:54 PM2023-12-04T12:54:50+5:302023-12-04T12:55:36+5:30

How to clean a stainless-steel and plastic buckets with the use of Baking soda : नव्या बादल्या डागांमुळे जुन्या दिसत असतील तर, २ चमचे बेकिंग सोड्याचा एक सोपा उपाय करा..

How to clean stainless-steel and plastic buckets with the use of Baking soda | स्टील-प्लास्टिकच्या बादल्यांवर मेणचट, खाऱ्या पाण्याचे डाग पडलेत? बेकिंग सोड्याचा एक सोपा उपाय, काही मिनिटात बादल्या चकाचक

स्टील-प्लास्टिकच्या बादल्यांवर मेणचट, खाऱ्या पाण्याचे डाग पडलेत? बेकिंग सोड्याचा एक सोपा उपाय, काही मिनिटात बादल्या चकाचक

प्रत्येक घरात मग आणि बादल्यांचा (Bucket Cleaning Tips) वापर होतोच. बादल्यांमध्ये पाणी साठवले जाते. यामुळे आंघोळ, कपडे धुणे यासह इतर बाथरूममधील कामं झटपट होतात. बादल्यांच्या सततच्या वापरामुळे, शिवाय खारे पाणी किंवा गढूळ पाण्यामुळे बादल्या आणखीन खराब होतात. बादल्यांवर मेणचट थर, कळकट डाग दिसतात. ज्यामुळे स्टील आणि प्लास्टिकच्या बादल्या आणखीन खराब दिसतात.

बादल्यांवरील हट्टी डाग काढण्यासाठी आपण साबणाचा वापर करतो. पण साबण आणि डिटर्जंटच्या वापरामुळे बादल्यांवरील हट्टी डाग सहसा लवकर निघत नाही (Cleaning Tips). हे डाग मेहनत न घेता, कमी वेळात काढायचे असतील तर, २ टिप्स वापरून पाहा. यामुळे स्टील आणि प्लास्टिकच्या बादल्या काही मिनिटात स्वच्छ होतील(How to clean stainless-steel and plastic buckets with the use of Baking soda).

स्टील-प्लास्टिकच्या बादल्या स्वच्छ करण्यासाठी टिप्स

प्लास्टिकची बादली स्वच्छ करण्यासाठी उपाय

बेकिंग सोडा-व्हिनेगर

प्लास्टिकच्या बाद्ल्यांवरील हट्टी डाग सहसा लवकर निघत नाही. ज्यामुळे अनेकदा पाहुण्यांसमोर आपल्याला लाजिरवाणे वाटू शकते. बादल्या स्वच्छ करण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करू शकता. बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर फक्त पदार्थ करण्यासाठी वापरात येत नसून, इतरही वस्तू स्वच्छ करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. यासाठी एका वाटीत समप्रमाणात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घेऊन पेस्ट तयार करा. तयार पेस्ट बादल्यांवर लावा. १० ते १५ मिनिटानंतर स्क्रबरने बादल्या घासून स्वच्छ करा.

किचन सिंक, खिडक्या, फरशी होईल चटकन स्वच्छ, फक्त डिश सोपऐवजी वापरा ४ गोष्टी, काही मिनिटात किचन चकाचक

स्टीलच्या बादल्या स्वच्छ करण्यासाठी टिप्स

बेकिंग सोडा-लिंबू

नारळ फोडणं अवघड, खोबरं काढणं कठीण वाटतं? १ भन्नाट ट्रिक, खोबरं काढण्याची सोपी युक्ती

स्टीलच्या बादल्या स्वच्छ करण्यासाठी सहसा लोकं साबण किंवा डिटर्जंटचा वापर करतात. पण याच्या वापराने फक्त कपडे स्वच्छ होतात, बादल्या नाहीत. स्टीलच्या बादल्या स्वच्छ करण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करू शकता. एका वाटीत २ चमचे बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि व्हिनेगर घेऊन पेस्ट तयार करा. तयार पेस्ट बादल्यांवर लावा. १० ते १५ मिनिटानंतर बादल्या स्क्रबरने घासून काढा, व पाण्याने स्वच्छ करा. यामुळे स्टीलची बादली काही मिनिटात स्वच्छ होईल.

Web Title: How to clean stainless-steel and plastic buckets with the use of Baking soda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.