Lokmat Sakhi >Social Viral > दुधावर ठेवण्याची जाळी स्वच्छ - चकचकीत करण्याचा सोपा उपाय, काळी झालेली जाळी दिसेल नव्यासारखी...

दुधावर ठेवण्याची जाळी स्वच्छ - चकचकीत करण्याचा सोपा उपाय, काळी झालेली जाळी दिसेल नव्यासारखी...

kitchen hacks : How to clean Stainless steel net cover : जाळीच्या झाकणाला छिद्र असल्याने त्यात घाण जाऊन साचते,अशावेळी ते स्वच्छ करणे कठीण असते... त्यासाठीच हा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2024 09:22 PM2024-06-15T21:22:32+5:302024-06-15T21:37:03+5:30

kitchen hacks : How to clean Stainless steel net cover : जाळीच्या झाकणाला छिद्र असल्याने त्यात घाण जाऊन साचते,अशावेळी ते स्वच्छ करणे कठीण असते... त्यासाठीच हा उपाय...

How to clean Stainless steel net cover | दुधावर ठेवण्याची जाळी स्वच्छ - चकचकीत करण्याचा सोपा उपाय, काळी झालेली जाळी दिसेल नव्यासारखी...

दुधावर ठेवण्याची जाळी स्वच्छ - चकचकीत करण्याचा सोपा उपाय, काळी झालेली जाळी दिसेल नव्यासारखी...

किचनमधील काही भांडी ही आपण विशेष काही कामांसाठीच वापरतो. आपल्या किचनमध्ये वेगवेगळ्या आकाराचे, साईजचे चमचे, डिश, वाट्या, ताट असतात.आपल्या गरजेनुसार आपण या भांड्यांचा वापर करतो. या भांड्यांमध्ये काही जाळीदार तर काही लहान छिद्र असलेली भांडी देखील असतात. जसे की, गाळण, जाळीदार गोल बास्केट, चाळणी, लहान छिद्र असलेली जाळी यांचा रोज वापर केला जातो(How to clean Stainless steel net cover).

कडधान्यांना मोड आणण्यासाठी अशा जाळीच्या  भांड्याचा वापर केला जातो. गरम केलेलं दूध किंवा इतर पदार्थ थंड होण्यासाठी त्यावर अशी जाळीची झाकणी ठेवली जाते. जेणेकरुन, गरम असलेल्या या पदार्थांतील वाफ या जाळीच्या भागातून निघून जाऊन पदार्थ लवकर थंड होण्यास मदत होते. याचबरोबर काही पदार्थ नाशवंत असतात ते टिकवून ठेवण्यासाठी आपण अशा जाळीच्या झाकणांचा वापर करतो. या जाळीच्या मोकळ्या भागांतून पदार्थ हवेशीर ठेवला जातो त्यामुळे तो खराब होत नाही. त्यामुळे अशा जाळीदार स्टिल नेट असलेल्या डिश वापरणे फायदेशीर ठरते. परंतु असे असले तरीही या जाळीदार डिश स्वच्छ करणे तितकेच मोठे कठीण काम असते. या डिश जाळीदार असल्याने त्यांच्या छोट्या छिद्रांत घाण जाऊन साचते. अशा जाळी स्वच्छ करणे सोपे नसते.

 हे जाळीचे झाकण स्वच्छ करणे गरजेचे असते. हे जाळीचे झाकण स्वच्छ केले नाहीत तर त्यात घाण साचून ते काळकुट्ट दिसू लागतात. ही भांडी कितीही घासणीने घासली तरी स्वच्छ होत नाहीत. अशावेळी आपण एक सोपी ट्रिक वापरुन हे जाळीचे झाकण स्वच्छ करु शकतो. ही जाळीदार भांडी नेमकी कशी स्वच्छ करायची ते पाहूयात. 

एक सोपी ट्रिक करुन पाहा... 

एका मोठ्या परातीमध्ये ३ ते ४ ग्लास गरम पाणी ओतावे. या गरम पाण्यात १/२ टेबलस्पून बेकिंग सोडा, ४ ते ५ टेबलस्पून डिश वॉश लिक्विड सोप घालावे. आता हे मिश्रण व्यवस्थित ढवळून एकजीव करुन घ्यावे. आता या मिश्रणात जाळीदार डिश संपूर्णपणे भिजतील अशा ठेवाव्यात. किमान १ तास तरी या डिश तशाच ठेवून द्याव्यात. त्यानंतर स्पंज किंवा घासणीच्या मदतीने आपण या डिश स्वच्छ करु शकता. सगळ्यात शेवटी या डिश पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. त्यानंतर कापडाने पुसून उन्हात सुकण्यासाठी ठेवून द्याव्यात. हा सोपा उपाय केल्याने जाळीदार डिशमधील छोट्या छिद्रांतील घाण सहजतेने काढता येऊ शकते. अशाप्रकारे आपण हे जाळीचे झाकण किंवा लहान छिद्र असलेली भांडी स्वच्छ करु शकतो.

किचन सिंक तेलकट - चिकटच राहते? करा १ सोपा उपाय, सिंक चमकेल नव्यासारखे...

Web Title: How to clean Stainless steel net cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.