Lokmat Sakhi >Social Viral > रंग खेळून झाला पण फरशीवर, भिंतींवर रंगाचे डाग पडले? ४ उपाय- डाग पुर्णपणे निघून जातील 

रंग खेळून झाला पण फरशीवर, भिंतींवर रंगाचे डाग पडले? ४ उपाय- डाग पुर्णपणे निघून जातील 

How To Clean Stains Of Holi Colours From Wall And Tiles: फरशीवर, भिंतीवर पडलेले होळीच्या रंगांचे डाग कसे काढून टाकावे, हा प्रश्न पडला असेल तर हे काही उपाय लगेच पाहून घ्या..(4 simple tips and tricks to clean holi colour stains from wall and tiles)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2025 09:15 IST2025-03-16T09:11:54+5:302025-03-16T09:15:02+5:30

How To Clean Stains Of Holi Colours From Wall And Tiles: फरशीवर, भिंतीवर पडलेले होळीच्या रंगांचे डाग कसे काढून टाकावे, हा प्रश्न पडला असेल तर हे काही उपाय लगेच पाहून घ्या..(4 simple tips and tricks to clean holi colour stains from wall and tiles)

how to clean stains of holi colours from wall and tiles, 4 simple tips and tricks to clean holi colour stains from wall and tiles  | रंग खेळून झाला पण फरशीवर, भिंतींवर रंगाचे डाग पडले? ४ उपाय- डाग पुर्णपणे निघून जातील 

रंग खेळून झाला पण फरशीवर, भिंतींवर रंगाचे डाग पडले? ४ उपाय- डाग पुर्णपणे निघून जातील 

Highlightsया काही टिप्स पाहा आणि तुमच्या घरातल्या भिंतींना, फरशांना लागलेला रंग चटकन स्वच्छ करून टाका..

रंग खेळताना तर आपण अतिशय उत्साहात रंग खेळतो. पण नंतर मात्र लक्षात येतं की आपल्यासोबतच सगळं घरसुद्धा रंगलं आहे. कारण एकमेकांना चढाओढ करत रंगविताना बराचसा रंग जमिनीवर सांडतो. आपले रंगाने माखलेले हात नकळत भिंतीला लागले जातात. त्यामुळे मग आपल्यासोबत आपल्या घराचा काही भागही रंगून जातो. यात जर सगळा रंग कोरडा असेल तर तो पुसून काढणे सोपे जाते. पण पक्क्या रंगाचे डाग जर लागले असतील तर ते स्वच्छ करताना मात्र अक्षरश: नाकी नऊ येतात (how to clean stains of holi colours from wall and tiles?). त्यामुळेच या काही टिप्स पाहा आणि तुमच्या घरातल्या भिंतींना, फरशांना लागलेला रंग चटकन स्वच्छ करून टाका..(4 simple tips and tricks to clean holi colour stains from wall and tiles)

फरशीवर, भिंतींवर पडलेले होळीच्या रंगांचे डाग कसे काढून टाकावे?

 

१. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी ज्या भिंतींवर किंवा फरशीवर डाग पडले आहेत त्या ठिकाणी थोडे गरम पाणी लावून घ्या. त्यानंतर एका वाटीमध्ये व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करा.

पोटऱ्या, मांड्यांवरची चरबी खूप वाढली? ५ मिनिटांचा सोपा व्यायाम, पायांचा बेढबपणा कमी होईल

आता हे मिश्रण जिथे डाग पडले आहेत तिथे लावून ठेवा. त्यानंतर ४ ते ५ मिनिटांनी पुन्हा त्यावर थोडे गरम पाणी घाला आणि घासणीने घासून घ्या. स्वच्छ पाण्याने पुसून घेतल्यानंतर डाग बऱ्याच प्रमाणात कमी झालेले दिसतील.

आजारपणामुळे गळून गेलात? ४ फळं खा! भरपूर एनर्जी मिळेल- थकवा, अशक्तपणा जाईल

२. टाईल्सवर पडलेले डाग काढायचे असतील तर ज्याठिकाणी डाग पडले आहेत त्या ठिकाणी थोडे लिंबू चोळा आणि नंतर गरम पाण्याने पुसून घ्या. डाग जातील.

 

३. डाग खूपच पक्के असतील तर त्याठिकाणी डिटर्जंट, लिंबाचा रस आणि बेकिंगसोडा एकत्र करून लावा आणि तारेच्या घासणीने घासून डाग काढून टाका.

ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात साक्षी धोनीची न्यारीच अदा- स्वत:च्या लग्नातले दागिने घालून 'अशी' सजली

४. फरशीवरचे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही टुथपेस्ट, मीठ आणि लिंबाचा रस या मिश्रणाचा वापरही करू शकता. जर तुमच्या घराच्या भिंतींना लश्चर पेंट मारलेला असेल तर या उपायाने तुम्ही भिंतींवरचे डागही काढून टाकू शकता.
 

Web Title: how to clean stains of holi colours from wall and tiles, 4 simple tips and tricks to clean holi colour stains from wall and tiles 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.