कपडे कितीही जपून वापरले तरी कधी कधी आपल्याकडून गडबडीत काही तरी चुकतं, पडतं, सांडतं आणि मग कपड्यांवर डाग पडतात. मोठ्या माणसांकडून अशी गडबड बऱ्याचदा होते आणि कपडे खराब होतात, तर मग लहानांची काय बात... लहान मुलेच ती. मातीत खेळतात, कुठेही लोळतात त्यामुळे त्यांचे कपडे नेहमी खराब होतातच. शाळेच्या गणवेशावर तर बऱ्याचदा पदार्थ सांडून डाग पडलेले असतात. त्यांच्या कपड्यांवरचे हे डाग स्वच्छ करणं हे मोठंच कठीण काम. पांढरे कपडे असतील तर हा त्रास आणखीनच वाढतो (How to clean stains on clothes?). म्हणूनच तुमचं हे काम सोपं आणि झटपट करायचं असेल तर एकदा हा सोपा उपाय पाहून घ्या (1 simple home remedy for cleaning clothes).
कपड्यांवर पडलेले डाग स्वच्छ करण्याचा सोपा उपाय
कमी मेहनतीत आणि कमी वेळेत कपड्यांवर पडलेले डाग कसे स्वच्छ करायचे, याचा एक सोपा उपाय creative_explained या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
जगभरातील 'बेस्ट' पदार्थांच्या यादीत असणारे ५ भारतीय व्हेज पदार्थ- बघा तुम्हालाही ते आवडतात का?
हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात अगदी सहजपणे उपलब्ध असणारे पदार्थ वापरायचे आहेत.
बेकिंग सोडा, लिंबाचा रस, व्हाईट व्हिनेगर आणि लिक्विड डिशवॉश डिटर्जंट असे ४ पदार्थ त्यासाठी आपल्याला लागणार आहेत.
सगळ्यात आधी एका वाटीमध्ये अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा घ्या. त्यात ५ ते ६ थेंब लिंबाचा रस, १ टीस्पून व्हाईट व्हिनेगर आणि २ टीस्पून लिक्विड डिशवॉश टाका.
हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि त्या मिश्रणाचे काही थेंब जिथे डाग पडला आहे, त्या डागावर टाका. मिश्रण टाकण्याआधी पाणी टाकून डाग थोडा ओलसर करून घ्या.
बघा कोणत्या पदार्थासाठी कोणतं तेल वापरावं, तब्येतीच्या ५० टक्के तक्रारी दूर होतील- वजनही घटेल
आता एका टुथपेस्टच्या मदतीने डागावर थोडं घासा. त्यानंतर टिश्यू पेपरने किंवा दुसऱ्या एखाद्या स्वच्छ कपड्याने डाग पुसून घ्या.
कपडा पुर्णपणे स्वच्छ होऊन जाईल. डाग कुठे पडला होता, ते लक्षातही येणार नाही.
डाग निघाला नाही, तर पुन्हा एकदा थोडं मिश्रण टाका आणि ब्रशने घासून पाहा.