Join us  

लेदर सोफ्यावर पडलेले डाग स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय, सोफा होईल चकाचक आणि सुगंधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 12:35 PM

How To Clean Stains On Leather Sofa?: लेदर सोफ्यावर पडलेले डाग स्वच्छ करण्यासाठी हा उपाय सोपा उपाय एकदा करून पाहा. सोफ्यांना येईल अगदी नव्यासारखी चमक... (home remedies to maintain the new look of leather sofa for years)

ठळक मुद्देसोफ्यावर डाग पडले नसतील तरीही हे मिश्रण वापरून तुम्ही लेदरचे सोफे पुसू शकता. महिन्यातून एकदा नियमितपणे या मिश्रणाने लेदर सोफे पुसले तर नक्कीच त्यांची चमक वर्षांनुवर्षे कायम राहील.

लेदरच्या सोफ्यांचा लूक खूपच वेगळा आणि ग्रॅण्ड असतो. शिवाय लेदरचे सोफे अतिशय मऊ आणि बसायला- उठायला खूपच आरामदायी असतात. त्यामुळे त्यांचा फिल वेगळाच असतो. घरात हे सोफे ठेवले की घराचा लूकही खूपच बदलून जातो आणि एकदम रॉयल वाटू लागतो. म्हणूनच लाकडी सोफ्यांऐवजी अनेक जण लेदर सोफे घेण्यास प्राधान्य देतात. लेदर सोफे मेंटेन करायला मात्र थोडे अवघड असतात. म्हणूनच इतर सोफ्यांपेक्षा त्यांना जरा जास्त जपावं लागतं. एखाद्यावेळी या सोफ्यावर काहीतरी सांडतं आणि डाग पडतोच (How To Clean Stains On Leather Sofa?). हे डाग स्वच्छ करण्याचं अवघड काम आता सोपं कसं करता येईल ते पाहूया...(home remedies to maintain the new look of leather sofa for years)

लेदर सोफ्यांवर पडलेले डाग स्वच्छ करण्याचा उपाय

 

इतर सोफ्यांवर डाग पडले तर आपण सरळ त्यांचे कव्हर काढतो आणि ते धुवून टाकतो. पण लेदर सोफ्यांच्या बाबतीत मात्र तसं करता येत नाही. म्हणूनच लेदर सोफ्यांवर पडलेले डाग स्वच्छ करणं हे अनेक जणींना महाकठीण काम वाटतं. त्यांचं हेच काम अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट कसं करायचं, ते आता पाहूया...

मेहेंदी लावल्याने केस कोरडे होतात? ३ पदार्थ घालून मेहेंदी भिजवा, छान रंग चढून केस होतील मऊ

लेदर सोफ्यांवरचे डाग काढून टाकण्यासाठी आपण निलगिरी तेलाचा (eucalyptus oil) वापर करणार आहोत. सगळ्यात आधी तर एका वाटीत निलगिरी तेलाचे ५ ते १० थेंब घ्या. त्यात पाव कप व्हिनेगर आणि पाव कप खोबरेल तेल टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.

 

आता जिथे डाग पडला आहे, तिथे या मिश्रणाचे काही थेंब टाका आणि एखाद्या टुथब्रशच्या मदतीने हलक्या हाताने ज्या जागेवर घासा. असं केल्याने सोफ्यावरचे डाग निघून जाण्यास मदत होईल.

फक्त १० मिनिटांत चेहऱ्यावर येईल गोल्डन गो, घरच्याघरी ब्लीच करण्याची बघा सोपी पद्धत

सोफ्यावर डाग पडले नसतील तरीही हे मिश्रण वापरून तुम्ही लेदरचे सोफे पुसू शकता. महिन्यातून एकदा नियमितपणे या मिश्रणाने लेदर सोफे पुसले तर नक्कीच त्यांची चमक वर्षांनुवर्षे कायम राहील.

हा उपाय तुम्ही लेदरची पर्स, बेल्ट, बूट आणि कारमधले सीट कव्हर पुसरण्यासाठीही करू शकता.  

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलहोम रेमेडी