Lokmat Sakhi >Social Viral > उशांवर डाग पडले, खराब झाल्या? न धुताही होतील स्वच्छ... करून बघा ३ सोपे उपाय 

उशांवर डाग पडले, खराब झाल्या? न धुताही होतील स्वच्छ... करून बघा ३ सोपे उपाय 

Cleaning Tips: गाद्या किंवा उशा खराब झाल्या असतील किंवा त्यांच्यावर वेगवेगळे डाग (stains on pillow or cushion) पडले असतील तर ते स्वच्छ करण्याचे हे काही उपाय करून बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 02:56 PM2022-12-29T14:56:56+5:302022-12-29T14:58:04+5:30

Cleaning Tips: गाद्या किंवा उशा खराब झाल्या असतील किंवा त्यांच्यावर वेगवेगळे डाग (stains on pillow or cushion) पडले असतील तर ते स्वच्छ करण्याचे हे काही उपाय करून बघा..

How to clean stains on pillow or cushion without washing it? | उशांवर डाग पडले, खराब झाल्या? न धुताही होतील स्वच्छ... करून बघा ३ सोपे उपाय 

उशांवर डाग पडले, खराब झाल्या? न धुताही होतील स्वच्छ... करून बघा ३ सोपे उपाय 

Highlightsएखाद- दुसरा डाग असेल तर तो दिसतही नाही. पण वारंवार वेगवेगळे डाग पडले तर मात्र ती उशी किंवा गादी अगदीच कळकट आणि घाण वाटू लागते.

उशांवरचे कव्हर्स, गाद्यांवरचे बेडशीट आपण नियमितपणे धुवून स्वच्छ करतो. पण बऱ्याचदा बेडशीटवर किंवा उशीवर काही पदार्थ सांडले तर त्याचे डाग मात्र उशांवर, गाद्यांवर पडतात आणि मग त्या धुता येत नसल्याने ते डाग वर्षानुवर्षे तसेच राहतात. एखाद- दुसरा डाग असेल तर तो दिसतही नाही. पण वारंवार वेगवेगळे डाग पडले तर मात्र ती उशी किंवा गादी अगदीच कळकट आणि घाण वाटू लागते. उशा आणि गाद्या धुणेही शक्य नसते. म्हणूनच मग या दोन्ही गोष्टी स्वच्छ करायच्या असतील, त्यांच्यावरचे डाग काढून टाकायचे असतील (How to clean stains on pillow or cushion without washing it?), तर हे काही घरगुती उपाय करून बघा. 

न धुता गाद्या- उशा कशा स्वच्छ करायच्या?
१. बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा वापर करून गाद्या- उशा यांच्यावरचे डाग स्वच्छ करता येतात. यासाठी उशांवर जिथे डाग पडलेले असतील तिथे बेकिंग सोडा पसरवून टाका.

खाली डोकं- वर पाय, वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री करतेय बघा कसा जबरदस्त व्यायाम- वाचा त्याचे ५ फायदे

१० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या आणि त्यानंतर एखादा ब्रश घेऊन ते डाग घासून काढा. नंतर २- ३ तास ती उशी उन्हात ठेवून द्या. डाग स्वच्छ होतील आणि उशांना येणारा जुनाट वासही निघून जाईल. 

 

२. टुथपेस्ट
उशा किंवा गाद्यांवर ज्या ठिकाणी डाग आहेत, त्यावर टुथपेस्ट लावा आणि ब्रशने तो भाग घासून काढा.

भरपूर भाज्या घालून केलेली चवदार पौष्टिक दलिया खिचडी, थंडीत करावाच असा गरमागरम बेत 

थोडेसे पाणी आणि एखादे स्वच्छ कापड घेऊन तिथल्या तिथेच ते डाग पुसून घ्या. डाग निघाला नाही, तर ही क्रिया पुन्हा करा. डाग स्वच्छ झाल्यानंतर उशी उन्हात वाळवत ठेवा. जेणेकरून टुथपेस्टचा वास निघून जाईल. 

 

३. काठीचा वापर
उशीवर किंवा गादीवर डाग नसतील, पण ती घाण झाली असेल तर तिच्यावरची धूळ स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काठीचा वापर करू शकता. गादीवर- उशीवर काठी आपटा आणि ती चांगली झटकून घ्या. धूळ निघून गादी स्वच्छ होईल. 
 

Web Title: How to clean stains on pillow or cushion without washing it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.