श्रावण सुरू होतो आणि त्यापाठोपाठ आपले सणवार सुरू होतात. सणावारांचे हे सत्र थेट दिवाळीपर्यंत सुरू राहाते. त्यानंतर लग्नसराई आणि मग संक्रात. असे एकानंतर एक उत्साहाचे, आनंदाचे क्षण येत राहतात. प्रत्येक प्रसंग साजरा करण्यासाठी मग आपण आपल्या ठेवणीतल्या साड्या हमखास काढतोच. सणवार असो किंवा मग लग्नसराई असो. महिलांच्या मागे गडबड, धावपळ असतेच. अशावेळी चुकून काहीतरी होतं आणि आपल्या खूप प्रेमाने जपलेल्या, अगदी सांभाळून सांभाळून वापरत असलेल्या साडीवर डाग पडतो. एकदा डाग पडला की साडी खराब झाली असं आपल्याला वाटतं (how to clean stains on pure silk saree?). म्हणूनच आता या काही टिप्स बघा.. त्यामुळे साडीवर पडलेले डाग अगदी चुटकीसरशी निघून जातील. शिवाय साडीचं अजिबात नुकसान होणार नाही. (home hacks to remove oil stains from pure silk saree?)
प्युअरसिल्क साड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे?
१. पुसून घ्या
सगळ्यात आधी तर आपल्या साडीवर एखादा ओला पदार्थ सांडला आहे हे लक्षात येताच तो पदार्थ कोरड्या कपड्याने, टिश्यू पेपरने किंवा पेपर नॅपकिन घेऊन तिथल्या तिथे टिपून घ्या. तो पदार्थ अजिबात आजुबाजुला पसरू देऊ नका.
मुलांचे केस खूपच पातळ आहेत- वाढतही नाहीत? जावेद हबीब सांगतात 'हे' तेल लावा, दाट होतील
२. पावडरचा वापर
साडीवर पडलेला डाग कोरड्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर त्यावर थोडी टाल्कम पावडर टाका. तुम्ही बेकिंग सोडा टाकला तरी चालेल. पावडर किंवा बेकिंग सोडा टाकल्यामुळे त्या डागाचा जो काही ओलसरपणा तुमच्या साडीवर असेल तो शोषून घेण्यास मदत होईल.
३. थंड पाण्याने धुवा
पावडर किंवा बेकिंग साेडा टाकल्यानंतर साधारण १० ते १२ मिनिटांनी साडीवर पडलेला डाग थंड पाण्याने धुवून टाका. थंड पाण्याचा वापर करताना खूप काळजीपुर्वक करा.
कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजची निवड कशी करावी? ५ टिप्स- परफेक्ट रंगसंगतीमध्ये दिसाल स्मार्ट
तो डागाचा भाग सोडून इतर ठिकाणी शक्यतो कुठेही पाणी लागू देऊ नका. गरम पाण्याचा वापर करणे कटाक्षाने टाळा. यानंतर थंड वातावरणातच साडी वाळू द्या. साडीवर पडलेला डाग गेलेला असेल. यानंतर तुम्ही साडी इस्त्री करून घेतली की साडीवर कुठे डाग पडला होता, हे लक्षातही येणार नाही.