Lokmat Sakhi >Social Viral > किचनमधल्या ट्यूब-बल्ब तेलकट आणि पिवळे झाले? ५ मिनिटांतच होतील स्वच्छ- ३ सोपे उपाय

किचनमधल्या ट्यूब-बल्ब तेलकट आणि पिवळे झाले? ५ मिनिटांतच होतील स्वच्छ- ३ सोपे उपाय

How To Clean Sticky, Oily Bulbs And Tube Lights In Kitchen: स्वयंपाक घरातले लाईट्स खूप चिकट, तेलकट, पिवळट होतात. ते कसे स्वच्छ करायचे यासाठी हे काही सोपे उपाय पाहा...(best home hacks to clean the lights in kitchen)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2024 03:43 PM2024-09-28T15:43:11+5:302024-09-28T15:45:44+5:30

How To Clean Sticky, Oily Bulbs And Tube Lights In Kitchen: स्वयंपाक घरातले लाईट्स खूप चिकट, तेलकट, पिवळट होतात. ते कसे स्वच्छ करायचे यासाठी हे काही सोपे उपाय पाहा...(best home hacks to clean the lights in kitchen)

how to clean sticky, oily bulbs and tube lights in kitchen, best home hacks to clean the lights in kitchen | किचनमधल्या ट्यूब-बल्ब तेलकट आणि पिवळे झाले? ५ मिनिटांतच होतील स्वच्छ- ३ सोपे उपाय

किचनमधल्या ट्यूब-बल्ब तेलकट आणि पिवळे झाले? ५ मिनिटांतच होतील स्वच्छ- ३ सोपे उपाय

Highlightsबाकी वस्तू तर आपण घासून चकाचक करू शकतो. पण लाईट कसे स्वच्छ करणार... त्यासाठीच बघा हे काही सोपे उपाय

घरातल्या सगळ्या खोल्या, सगळ्या खोल्यांमध्ये असणारे लाईट आणि पंखे तसेच फरशा स्वच्छ करणे हे काम एकीकडे आणि स्वयंपाक घरातले लाईट, पंखे आणि फरशा स्वच्छ करणं हे काम दुसरीकडे... कारण स्वयंपाक घरातलं स्वच्छतेचं काम खूपच किचकट आहे. स्वयंपाक घरात दररोजच आपण फोडण्या घालतो, वेगवेगळ्या भाज्या, फळं चिरतो, कणिक मळतो अशी असंख्य ओली कामे आपण सतत स्वयंपाक घरात कत असतो. त्यामुळे स्वयंपाक घरातल्या खिडक्या, लाईट, पंखे, फरशा असं सगळंच खूप चिकट, मेनचट होऊन जातं (how to clean sticky, oily bulbs and tube lights in kitchen?). बाकी वस्तू तर आपण घासून चकाचक करू शकतो. पण लाईट कसे स्वच्छ करणार... त्यासाठीच बघा हे काही सोपे उपाय (best home hacks to clean the lights in kitchen)

स्वयंपाक घरातले चिकट, पिवळट झालेले लाईट स्वच्छ करण्याचा उपाय 

 

१. बेकिंग सोडा 

स्वयंपाक घरातले चिकट झालेले लाईट स्वच्छ करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे बेकिंग सोड्याचे सोल्युशन वापरणे. यासाठी १ कप पाणी घ्या आणि त्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा टाका.

पाठ- मान- कंबरदुखीने त्रस्त आहात? फक्त १ मिनिटासाठी 'हे' स्ट्रेचिंग करा, चटकन आराम मिळेल

हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि एखादा कॉटनचा कपडा त्या मिश्रणात भिजवून त्याने लाईट पुसा. 

 

२. लिंबू आणि बेकिंग सोडा 

साध्या बेकिंग सोड्याने पुसून लाईटवरचा चिकटपणा गेला नाही तर लिंबाचा वापर करा. यासाठी बेकिंग सोडा, पाणी आणि लिंबाचा रस असं एक मिश्रण तयार करा.

सासू असावी तर अशी! आलिया- रणबीरला सुखी संसारासाठी काय सल्ला द्याल? नीतू कपूर म्हणाल्या....

हे मिश्रण लाईटवर थोडा वेळ लावून ठेवा आणि त्यानंतर पुन्हा एखादा ओला कपडा घेऊन लाईट स्वच्छ करा. लिंबू आणि बेकिंग सोड्याच्या एकत्रित परिणामामुळे लाईटवरचा चिकटपणा अलगदपणे निघून जाईल.

 

३. डिशवॉश लिक्विड 

डिश वॉश लिक्विड वापरून तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने स्वयंपाक घरातले चिकट झालेले लाईट स्वच्छ करू शकता.

प्रियांका चोप्रासारखी सुंदर चमकदार त्वचा-दाट केस हवेत? करा तिच्या आईने सांगितलेला उपाय

पण कोणतीही घासणी किंवा पावडर डिटर्जंटचा वापर त्यासाठी करू नका. कारण लाईटच्या काचेवर लगेच चरे पडण्याची भीती असते.

 

Web Title: how to clean sticky, oily bulbs and tube lights in kitchen, best home hacks to clean the lights in kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.