Join us  

तेलाची किटली खूपच तेलकट- चिकट झाली? २ सोपे उपाय- किटली चटकन होईल स्वच्छ नव्यासारख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 3:02 PM

How To Clean Sticky Oily Oil Bottle Or Oil Can: रोजची तेलाची कॅन किंवा बाटली खूपच चिकट- तेलकट झाली असेल तर हे काही उपाय करून पाहा...(2 remedies to clean oil bottle)

ठळक मुद्देतेलकट- चिकट झालेल्या बरण्या स्वच्छ करण्यासाठी नेहमी तारेची घासणीच वापरावी. वायरच्या घासणीने बाटल्या एवढ्या स्वच्छ होत नाहीत. 

तेलाची बरणी किंवा बाटली ही अगदी रोजच्या वापरातली वस्तू. रोजच्या कामाच्या धावपळीत ही बरणी आपण खूप घाईघाईने हाताळत असतो. आधीच तेलाचे ओघळ आल्याने ही बरणी तेलकट होते. त्यात पुन्हा त्या बरणीला किंवा बाटलीला बऱ्याचदा पीठाचा, मीठाचा हात लागतोच. त्यामुळे मग आधीच तेलकट असलेली बाटली खूपच चिकट होऊन जाते (How to clean sticky oily oil bottle or oil can in marathi). अशी बाटली स्वच्छ करणं हे मोठंच मेहनतीचं आणि वेळखाऊ काम असतं. पण आता हे काम अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहूया.. (2 remedies to clean oil bottle)

तेलाची बाटली स्वच्छ करण्याचे उपाय

 

पहिला उपाय 

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात एकदम कडक पाणी घ्या. त्या पाण्यात थोडं मीठ, थोडं लिक्विड डिशवाॅश आणि थोडा लिंबाचा रस टाका. हे पाणी कोमट होईपर्यंत त्यात तेलाची बाटली भिजू द्या.

रोप लावताना कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका, भराभर वाढतील झाडं, फुलं- फळं येतील भरपूर

त्यानंतर बाटली पाण्यातून काढून घ्या आणि मग लिक्विड सोप लावून तारेच्या घासणीने घासून काढा. बरणी स्वच्छ होऊन जाईल. बाटलीच्या आतली बाजू घासण्यासाठी त्यात कडक पाणी, मीठ आणि लिंबाचा रस टाकून ठेवा. त्यानंतर पाणी काेमट झालं की बाटली घासण्याच्या ब्रशने बाटली आतून घासून घ्या.

दुसरा उपाय 

 

दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला भाताचा वापर करायचा आहे. आपल्याला माहितीच आहे की भात अतिशय चिकट असतो. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी बाटलीवर कडक पाणी ओता.

न्यू इयर पार्टीसाठी फक्त ३ स्टेपमध्ये घरच्याघरी करा फेशियल- चेहऱ्यावर येईल भरपूर ग्लो

त्यानंतर त्यावर भात लावून तो चोळा. यानंतर मीठ लावून बरणी चोळा. नंतर डिशवॉश लावून बरणी तारेच्या घासणीने घासून घ्या. तेलकट- चिकट झालेल्या बरण्या स्वच्छ करण्यासाठी नेहमी तारेची घासणीच वापरावी. वायरच्या घासणीने बाटल्या एवढ्या स्वच्छ होत नाहीत. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलकिचन टिप्सहोम रेमेडी