Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात एक्झॉस्ट फॅन, किचनच्या टाईल्स खूपच चिकट होतात? पाहा तेलकटपणा घालविण्याचा सोपा उपाय 

पावसाळ्यात एक्झॉस्ट फॅन, किचनच्या टाईल्स खूपच चिकट होतात? पाहा तेलकटपणा घालविण्याचा सोपा उपाय 

Home Hacks: इतर कोणत्याही ऋतूपेक्षा पावसाळ्यात स्वयंपाक घरातल्या टाईल्स आणि एक्झॉस्ट पंखे जरा जास्तच तेलकट, चिकट होतात.. (simple home remedies to clean sticky oily tiles and exhaust fan in kitchen )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 04:44 PM2024-07-25T16:44:33+5:302024-07-25T16:45:30+5:30

Home Hacks: इतर कोणत्याही ऋतूपेक्षा पावसाळ्यात स्वयंपाक घरातल्या टाईल्स आणि एक्झॉस्ट पंखे जरा जास्तच तेलकट, चिकट होतात.. (simple home remedies to clean sticky oily tiles and exhaust fan in kitchen )

how to clean sticky oily tiles and exhaust fan in kitchen  | पावसाळ्यात एक्झॉस्ट फॅन, किचनच्या टाईल्स खूपच चिकट होतात? पाहा तेलकटपणा घालविण्याचा सोपा उपाय 

पावसाळ्यात एक्झॉस्ट फॅन, किचनच्या टाईल्स खूपच चिकट होतात? पाहा तेलकटपणा घालविण्याचा सोपा उपाय 

Highlightsकमीतकमी मेहनतीत एक्झॉस्ट पंखा तसेच स्वयंपाक घरातल्या चिकट झालेल्या टाईल्स स्वच्छ कशा करायच्या ते पाहूया..

पावसाळ्यात सगळीकडेच दमट हवा असते. पाऊस सतत पडत नसला तरी वातावरणात एक प्रकारचा दमटपणा, ओलसरपणा असतो. एकीकडे ही दमट ओलसर हवा आणि दुसरीकडे स्वयंपाक करताना निघणाऱ्या वाफा, धूर यांचा एकत्रित परिणाम होतो  आणि मग स्वयंपाक घरातल्या गॅस शेगडीच्या वरच्या आणि मागच्या बाजुच्या टाईल्स जास्तच चिकट, तेलकट होतात. बऱ्याचदा तर या दिवसांत त्याच्यावर किटन जमलेलंही दिसतं. ज्या ठिकाणी खूप जास्त पाऊस असतो, तिथे तर हा त्रास जरा जास्त असतो. म्हणूनच अशावेळी हा उपाय तुमच्या खूप उपयोगी पडणारा ठरू शकतो. हा उपाय करून कमीतकमी मेहनतीत एक्झॉस्ट पंखा तसेच स्वयंपाक घरातल्या चिकट झालेल्या टाईल्स स्वच्छ कशा करायच्या ते पाहूया.. (easy method for cleaning sticky oily tiles and exhaust fan in kitchen)

स्वयंपाक घरातल्या चिकट, तेलकट टाईल्स स्वच्छ करण्याचा उपाय

 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कॉस्टिक सोडा लागणार आहे. तुमच्या जवळच्या मेडिकल दुकानातून किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही तो मागवू शकता.

 

केस खूप गळतात- पांढरेही झाले? 'या' पद्धतीने आवळा पावडर लावा- काही दिवसांतच होतील दाट

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी हातामध्ये ग्लोव्ह्ज घालून घ्या. कारण कॉस्टिक सोडा हाताला लागला तर त्वचा ड्राय पडू शकते.

एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे कॉस्टिक सोडा घ्या. त्यामध्ये दोन कम गरम पाणी आणि १ चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाका. सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र हलवून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. 

 

आता हे पाणी तेलकट झालेल्या टाईल्सवर, एक्झॉस्ट पंख्यावर टाका. हे पाणी जेव्हा सुकेल तेव्हा त्यावर पुन्हा एकदा कॉस्टिक सोडा आणि गरम पाणी यांचं मिश्रण टाका. यानंतर घासणी घेऊन तेलकट टाईल्स, एक्झॉस्ट पंखा पुसून घ्या.

वजन वाढेल म्हणून तूप खाणं टाळता? आहारतज्ज्ञ सांगतात, तूप खाऊन वजन घटवण्याचे २ उपाय

हा उपाय केल्यानंतर टाईल्सचा तेलकटपणा बऱ्याच प्रमाणात निघून जाईल. पण तरी तुम्हाला त्या स्वच्छ वाटल्या नाहीत किंवा त्या खूपच जास्त तेलकट, चिकट झाल्या असतील तर हा उपाय पुन्हा एकदा करा. टाईल्स, एक्झॉस्ट पंखा चकाचक होतील. 
 

Web Title: how to clean sticky oily tiles and exhaust fan in kitchen 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.