Join us  

पीठ मळताना बोटांतल्या अंगठ्यात पीठ अडकते ? ५ सोप्या टिप्स- अंगठ्या आणि हात स्वच्छ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 3:05 PM

How To Clean Stuck Flour From Bangles, Bracelets & Rings : स्वयंपाकघरात काम करताना हातातल्या बांगड्या-अंगठ्यात अनेक गोेष्टी अडकतात, बोटांत जखमाही होतात म्हणून हे खास उपाय

आपण जोपर्यंत एखादी गोष्ट स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवता, तोपर्यंत ती अधिक काळ सुंदर दिसते. याउलट, जर आपण स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले तर कोणतीही गोष्ट लवकर जुनी आणि दिसताना खराब दिसते. कोणतीही गोष्ट नवीन ठेवण्यासाठी आणि त्याची चमक टिकवून ठेवण्यासाठी तिची स्वच्छता खूप महत्त्वाची असते. आपल्या हातात घातलेल्या रोजच्या वापरातील बांगड्या, ब्रेसलेट, अंगठ्या यांचीही अशीच स्थिती असते. आपण रोजचा स्वयंपाक करताना यामध्ये पीठ मळताना पीठ अडकते. त्याचबरोबर हे वेळीच साफ न केल्यामुळे ते या दागिन्यांच्या डिझाईन्समध्ये अडकतात. असे वारंवार होत राहिल्याने मग या दागिन्यांची चमक काहीशी कमी होते किंवा ते जुने दिसू लागतात. 

आपल्यापैकी बऱ्याचजणांना सोन्या चांदीचे दागिने घालण्याची हौस अधिक असते. जवळपास प्रत्येकाकडे सोन्याचे दागिने असतात. अशा परिस्थितीत, त्याच्या देखभालीकडे लक्ष देणे देखील खूप महत्वाचे असते. सोनं सतत घातल्यामुळे ते काही काळानंतर काळे दिसू लागते. याचबरोबर रोजच्या वापरातील हातातील बांगड्या, अंगठ्या, ब्रेसलेट हे पीठ मळताना खराब होऊन काळे दिसू नये म्हणून काही टिप्स लक्षात ठेवूयात(How To Clean Stuck Flour From Bangles, Bracelets & Rings).

१. अंगठी आणि ब्रेसलेट कसे स्वच्छ करावे.... 

ब्रेसलेट आणि अंगठी स्वच्छ करण्यासाठी अंगठी आणि ब्रेसलेट सर्वप्रथम हलक्या गरम पाण्यांत भिजत ठेवावे. यासाठी स्टीलच्या भांड्यात एक चमचा डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड घाला आणि दोन चमचे व्हिनेगर घाला. आता त्यात अंगठी आणि ब्रेसलेट भिजत ठेवा. १५ ते २० मिनिटे ते तसेच या मिश्रणात भिजत ठेवा. त्यानंतर ब्रेसलेट आणि रिंग बाहेर काढून नंतर टूथब्रशच्या मदतीने स्क्रब करा. बांगडीच्या डिजाईनमध्ये अडकलेले पीठ बाहेर आल्यावर पुन्हा एकदा टूथब्रशने स्क्रब करून घ्या. हा उपाय केल्याने ब्रेसलेट आणि रिंग पूर्णपणे स्वच्छ होईल. 

उशीच्या महागड्या कव्हरवर तेलाचे डाग पडले ? उशी कव्हर धुण्याची १ सोपी ट्रिक, डाग गायब...

 

२. बेकिंग सोडा :- बेकिंग सोडा सामान्यतः स्वयंपाकात वापरला जातो. आपण याचा वापर करुन आपले सोन्याचे दागिने स्वच्छ (Clean) करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 2 चमचे सोडा कोमट पाण्यात विरघळवून पेस्ट बनवायची आहे. आता दागिने त्यात अर्धा तास बुडवून ठेवा. नंतर स्पंजने हलक्या हाताने घासून स्वच्छ करा.

रोजचे टॉवेल वापरून कापड झाले कडक व खराब ? टॉवेल धुण्याच्या टिप्स, कापड राहील मऊसूत...

३. लिंबू :- लिंबूमध्ये नैसर्गिकरित्या घाण, अस्वच्छता साफ करणारे घटक असतात. अशा परिस्थितीत, आपण सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी देखील ते वापरू शकता. यासाठी एका भांड्यात गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. आता त्यात २० ते ३० मिनिटे दागिने राहू द्या. आता ब्रशने हळूवारपणे स्वच्छ करा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकण्यापूर्वी करा ६ गोष्टी, कपडे भूरकट होणं टाळा...

४. हळद :- सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात उकळलेले पाणी घ्या. आता त्यात थोडी वॉशिंग पावडर आणि चिमूटभर हळद घाला आणि दागिने ३० मिनिटे तसेच ठेवून द्यावेत. नंतर ते बाहेर काढा आणि टूथब्रशने हलके स्क्रब आणि स्वच्छ पाण्याने धुवा. अंगठी, ब्रेसलेट, बांगड्या पुन्हा नव्यासारख्या चमकतील. 

एकदा वापरलेला बटर पेपर फेकून न देता, पुन्हा वापरण्याची १ भन्नाट ट्रिक...

५. टूथपेस्ट :- सोने स्वच्छ करण्यासाठी, टूथब्रशला टूथपेस्ट लावा आणि घाण काढून टाकण्यासाठी दागिने हलक्या हाताने घासून घ्या. आपण टूथब्रशऐवजी मऊ कापडही वापरू शकता. या पद्धतीने एम्बेड केलेले हिरे साफ करणे सहज शक्य होते.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स