उन्हाळ्याचे दिवस आता जवळ येऊ लागले आहेत. त्यामुळे इतके दिवस झाकून ठेवलेले टेबल फॅन आता वर येऊ लागले आहेत. काही ठिकाणी तर एवढी उष्णता असते की या पंख्यांचा वापर त्यांना वर्षभर करावा लागतो. टेबल पंखे असो किंवा मग सिलिंग फॅन असो त्यांच्यावर धूळ बसतेच आणि ते नियमितपणे स्वच्छही करावेच लागतात. सिलिंग पंखे स्वच्छ करणं एकवेळ सोपं, पण टेबल फॅन स्वच्छ करणं हे अनेक जणींना खूप कठीण काम वाटतं. कारण आधी त्याची जाळी काढावी लागते, ती स्वच्छ पुसावी लागते, त्यानंतर मग आतला पंखा स्वच्छ करावा लागतो (how to clean table fan instantly?). या सगळ्या कामांमध्ये खूप वेळ जातो (most easy method of cleaning table fan). त्यामुळेच हे काम तुम्हाला झटपट आणि कोणतीही विशेष मेहनत न घेता करायचं असेल तर हा एक सोपा उपाय पाहा...(simple tricks and tips to clean table fan)
ब्रशसुद्धा न लावता पंखा स्वच्छ करण्याचा सगळ्यात सोपा उपाय
कमीतकमी मेहनतीत थोडेसुद्धा न घासता पंखा कसा स्वच्छ करायचा याविषयी माहिती सांगणारा एक सोपा उपाय money_saving_man09 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
अस्सल मराठी दागिना; पाहा कुड्यांचे ७ सुंदर डिझाइन्स! लग्नातला साज कुडीशिवाय अपूर्णच..
हा उपाय करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये २ चमचे डिशवॉश लिक्विड, दोन चमचे व्हिनेगर आणि तेवढंच कोमट पाणी घ्या. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवा आणि ते पंख्याच्या पात्यांवर शिंपडा.
त्यानंतर एक मोठ्या आकाराची प्लास्टिकची बॅग किंवा प्लास्टिकचे पोते पंख्याभोवती सैलसर गुंडाळा. अर्धा ते एक मिनिटासाठी पंखा सुरू करा. त्यानंतर पंखा बंद करा. जेव्हा तुम्ही पंखा बंद कराल आणि त्यावर गुंडाळलेली प्लास्टिकची पिशवी काढाल तेव्हा पंखा स्वच्छ झाल्यासारखा जाणवेल.
रोजचाच त्रास- जोर लावूनही पोट साफ होत नाही? ५ उपाय- बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल
हा उपाय करणं अनेकांना धोकादायक वाटत आहे. कारण पंख्यावर पिशवी गुंडाळलेली असताना ताे सुरू करणं कितपत सुरक्षित असू शकतं, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे हा उपाय करण्यापुर्वी तुम्हीही एकदा विचार करा, सुरक्षिततेची काळजी घ्या आणि मगच करून पाहा.