Join us  

अधिक मास आणि श्रावणात घरातली तांब्या-पितळीची भांडी दिसतील चकचकीत-घ्या १ सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2023 1:06 PM

How To Clean Tambe Pital Copper and Brass Utensils by home made paste home Remedy : सोप्या उपायाने साफ होतील देवघरातली भांडी...

अधिक मासानिमित्त आपण मुलगी आणि जावई किंवा मेहूणाला घरी जेवायला बोलवतो. कधी ३३ मेहूण तर कधी विष्णू याग, गणेश याग अशा विविध पुजा केल्या जातात. श्रावण महिन्यात तर अनेकांकडे सत्यनारायणाची पूजा असते. काही जणांकडे मंगळागौरीसारख्या पूजाही असतात. या सगळ्यासाठी आपल्याला देवाची तांब्या-पितळयाची भांडी लागतातच. यामध्ये ताम्हण, पळी, तांब्या, पेला यांबरोबरच विविध प्रकारचे दिवे, देवाच्या मूर्ती यांचा समावेश असतो. नियमीतपणे हे वापरत नसल्यास यावर एकप्रकारचा काळपट थर जमा झालेला दिसतो. हा थर काढण्यासाठी आपण बाजारातले महागड्या पावडरी किंवा सोल्यूशन्स वापरतो. पण त्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास ही तांब्या-पितळ्याची भांडी अगदी सहज चमकू शकतात. यासाठी नेमके काय करायचे पाहूया (How To Clean Tambe Pital Copper and Brass Utensils by home made paste home Remedy)...

१. एका वाटीत २ चमचे बेसनाचे पीठ घ्यायचे आणि त्यामध्ये मीठ, हळद घालायची. 

(Image : Google)

२. यात १ चमचा दही घालून वर अर्धे लिंबू पिळायचे आणि सगळे मिश्रण चांगले एकजीव करायचे. 

३. हे मिश्रण तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यांना सगळ्या बाजूने लावायचे. यासाठी आपण घासणी किंवा हाताचाही वापर करु शकतो. 

४. हलक्या हाताने यावर असलेले डाग स्क्रब केले की सहज निघतात मात्र खूप जास्त डाग असतील तर ते निघत नाहीत.

५. ही पेस्ट लावलेली भांडी साधारण १० मिनीटे अशीच ठेवायची आणि नंतर पाण्याने चोळून धुवून टाकायची. 

६. एरवी पितांबरीने किंवा इतर लिक्विडने हात काळे होण्याची शक्यता असते. मात्र या घरगुती पेस्टमुळे हात काळे पडत नाहीत. 

७. धुतल्यानंतर ही भांडी फडक्याने लगेच कोरडी करुन ठेवायची. ती अतिशय छान चमकदार दिसतात. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स