Lokmat Sakhi >Social Viral > झटपट तवा घासण्याची नवीन आयडिया, फक्त एका टोमॅटोने चमकेल काळपट तवा, पाहा सोपी ट्रिक

झटपट तवा घासण्याची नवीन आयडिया, फक्त एका टोमॅटोने चमकेल काळपट तवा, पाहा सोपी ट्रिक

How To Clean Tawa in 2 min, Use Tomato to Clean Tawa एक टोमॅटो करेल प्रत्येक भांड्यांना झटपट साफ, तवा घासण्याची ही पाहा नवीन हटके ट्रिक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2023 05:02 PM2023-04-09T17:02:22+5:302023-04-09T17:03:08+5:30

How To Clean Tawa in 2 min, Use Tomato to Clean Tawa एक टोमॅटो करेल प्रत्येक भांड्यांना झटपट साफ, तवा घासण्याची ही पाहा नवीन हटके ट्रिक..

How To Clean Tawa in 2 min, Use Tomato to Clean Tawa | झटपट तवा घासण्याची नवीन आयडिया, फक्त एका टोमॅटोने चमकेल काळपट तवा, पाहा सोपी ट्रिक

झटपट तवा घासण्याची नवीन आयडिया, फक्त एका टोमॅटोने चमकेल काळपट तवा, पाहा सोपी ट्रिक

भांडी स्वच्छ करणं खरं तर अवघडचं काम आहे.  काळपट - करपलेली भांडी घासताना नाकीनऊ येतात. मुख्य म्हणजे तवा. तव्यावर आपण चपाती, भाकरी, बेसन पोळी इत्यादी पदार्थ बनवतो. हे पदार्थ बनवत असताना तव्यावर चिकटण्याची शक्यता जास्त असते. ज्यामुळे ते लगेच काळपट पडतात. कितीही घासलं तरी तव्यातील काळपटपणा लवकर निघत नाही.

तवा स्वच्छ नव्यासारखा हवा असेल तर, टोमॅटोचा वापर करा. फक्त एका टोमॅटोमुळे तवा नव्यासारखा चमकेल. या ट्रिकमुळे अधिक मेहनत घेऊन तवा घासण्याची गरज लागणार नाही. या मिश्रणाने तव्यासह इतर भांडीही घासता येईल. चला तर मग कोणती आहे ही ट्रिक पाहूयात(How To Clean Tawa in 2 min, Use Tomato to Clean Tawa).

तवा घासण्यासाठी लागणारं साहित्य

टोमॅटो

लिंबाचा रस

बेकिंग सोडा

पाणी लागल्याने खराब होतो म्हणून लायटर स्वच्छच करत नाही? ५ टिप्स-चिकट लायटर होईल चकाचक

या पद्धतीने घासा काळपट तवा

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये टोमॅटोच्या आतील गर व त्याच्या बिया घ्या. त्यानंतर त्यात एक लिंबाचा रस मिसळून मिश्रण मिक्स करा. शेवटी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिश्रण चांगलं एकत्र करा. आता हे मिश्रण तव्यावर पसरवून ठेवा. १५ ते २० मिनिटांसाठी हे मिश्रण तव्यावर ठेवा. जेणेकरून मिश्रण तव्यावरील काळपटपणा काढून टाकेल.

भांडी घासण्याचा साबण संपला? ५ घरगुती सोपे उपाय, साबणाविना भांडी चकाचक

१५ मिनिट झाल्यानंतर २ मिनिटांसाठी गॅसवर तवा ठेवा, तवा गरम आहे, तोपर्यंत घासणीच्या मदतीने तवा स्वच्छ घासून काढा. अधिक मेहनत न घेता हा तवा घासला जाईल, त्यावरील काळपटपणा निघून जाईल. व नव्यासारखा चमकेल.

Web Title: How To Clean Tawa in 2 min, Use Tomato to Clean Tawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.