Join us  

चहाची गाळणी स्वच्छ-चकचकीत-नव्यासारखी करण्याचा १ सोपा उपाय, वेळही वाचेल आणि स्वच्छताही पटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 5:13 PM

How To Clean Tea Strainer : काळ्याकुट्ट गाळणीतून चहा गाळला तर तो प्यायची इच्छा होत नाही, म्हणून गाळणी साफ करण्याचा सोपा उपाय..

चहा हा भारतीय घरांमध्ये अगदी सर्रास केली जाणारी गोष्ट. सकाळी उठल्यावर पिण्यासाठी, नाश्त्यानंतर, ४ वाजता अशा ठराविक वेळांना आणि एरवीही अनेकांना सतत चहा लागतो. घरात जास्त माणसं असतील तर चहाचे आधन तयारच असते. कोणी पाहुणे आले तरी आपण अगदी सहज पटकन चहा टाकतो. म्हणूनच चहाला अमृत म्हटले जाते. चहासाठी चहा, साखर आणि कप-बशी जितकी महत्त्वाची असते. तितकीच आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते. ती म्हणजे गाळणे. चहा पावडर गाळण्यासाठी आपल्याला हे गाळणे लागतेच (How To Clean Tea Strainer). 

काही चहा पवडर जाडसर असतात त्यामुळे चहाचा गाळ कचऱ्यात टाकला की त्या साफ होतात. पण चहाचे काही कण इतके बारीक असतात की ते या गाळणीत अडकून बसतात. मग ते कितीही साफ केले तरी गाळणीतून निघत नाहीत. गाळणी काळी तर दिसतेच पण आरोग्याच्या दृष्टीनेही अशी अस्वच्छ गाळणी चांगली नसते.  अशावेळी आपण ही गाळणी गॅस बर्नरवर ठेवून गरम करतो आणि मग आपटून हे कण काढण्याचा प्रयत्न करतो. काही जण गाळणी जास्तच काळी झाली तर फेकूनही देतात.

(Image : Google)

पण असे करण्यापेक्षा सोप्या पद्धतीने गाळणी स्वच्छ कशी करायची याची १ सोपी ट्रीक आज आपण पाहणार आहोत. इन्स्टाग्रामवर नेहा दिपक शहा या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अतिशय आवश्यक असलेली ही ट्रीक शेअर केल्याबद्दल हजारो जणांनी हा व्हिडिओ लाईक केला असून या ट्रिकचे कौतुक करत आणखी काही ट्रीक सांगितल्या आहेत.  

१. एका पातेल्यात पाणी घेऊन ते चांगले उकळून घ्यावे. त्यामध्ये १ चमचा बेकींग सोडा घालावा. 

२. गॅस चालू असतानाच या पातेल्यात गाळणे घालावे. त्यावर लिक्विड डीश सोप घालून ७ ते ८ मिनीटे हे चांगले उकळू द्यावे. 

३. त्यानंतर गाळणे बाहेर काढून खराब टूथब्रश आणि डीश सोपने गाळणे आतून आणि बाहेरुन चांगले घासावे. 

४. त्यानंतर गाळणे पुन्हा एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये ठेवावे. त्यावेळी या गाळणीत अडकलेले चहाचे कण पाण्यात बाहेर आलेले दिसतील. 

५. अशापद्धतीने १५ दिवसांतून किंवा महिन्यातून एकदा गाळणी साफ केली तर ती नव्यासारखी राहील.  

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्स