Join us  

चहाची गाळणी काळीकुट्ट,खराब झालीये? ३ ट्रिक्स, न घासता फक्त २ मिनिटात स्वच्छ होईल गाळणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 2:40 PM

How to clean tea strainer : एकदा गाळणी काळी पडायला सुरूवात झाली की ती जास्तच काळपट होत जाते आणि खराब दिसते.

सकाळ संध्याकाळ चहा गाळण्यासाठी चहाच्या गाळणीचा वापर केला  जातो. एकदा गाळणी आणल्यानंतर ३ ते ४ महिने वापरली जाते. काहीजण तर वर्षानुवर्ष गाळण्या बदलत नाहीत. अशा स्थितीत रोज गाळणी वापरून त्या काळ्या पडू लागतात. एकदा गाळणी काळी पडायला सुरूवात झाली की ती जास्तच काळपट होत जाते आणि खराब दिसते. (How to clean tea strainer)

घरात कोणीही पाहूणे आल्यानंतर अशी मळकट, अस्वच्छ गाळणी अजिबात चांगली  दिसत नाही. गाळणी स्वच्छ करण्याासाठी काहीजण तासनतास ही गाळणी घासत बसतात. गाळणी स्वच्छ करण्याच्या  सोप्या टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Tips to clean black and blocked tea strainer chai ki channi)

सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. या पाण्यात १ टेबलस्पून बेकींग सोडा आणि डिशवॉश लिक्वीड घाला. पाणी उकळल्यानंतर त्यात गाळणी घाला. गाळणी बाहेर काढून डिश वॉश लिक्वीडच्या मदतीनं वापरात नसलेल्या ब्रशनं घासून घ्या. गाळणी घासून स्वच्छ पाण्यात बुडवा. तुम्हाला दिसेल की सर्व घाण निघून गेली आहे.

२६३ किलो वजन होतं, पठ्ठ्यानं १५९ किलो घटवलं; नाश्त्याला खायचा हे २ पदार्थ, फिट टू फॅट प्रवास

प्लास्टीकची चहाची गाळणी स्वच्छ करण्याासाठी  स्वच्छ पाण्यात अंघोळीचा साबण बुडवून १५ मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या. नंतर टुथब्रशच्या मदतीनं रगडून स्वच्छ करा.  या उपायानं गाळणी नव्यासारखी दिसेल.  जर गाळणी जास्त खराब झाली असले तर  रात्री साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवा. महिन्यातून एकदा उपाय केल्यासही चांगला परीणाम दिसून येईल.

स्टिलची गाळणी साफ करण्यासाठी सगळ्यात आधी गॅस ऑन करा आणि त्यावर गाळणी गरम करून घ्या. असं केल्यानं स्टिलच्या गाळणीवर जमा झालेली घाण निघून जाईल आणि गाळणी पूर्णपणे स्वच्छ होईल. नंतर टुथपेस्ट लावून गाळणी घासून घ्या.

पोट नीट साफ होत नाही; गॅसमुळे भूकही लागत नाही? तज्ज्ञ सांगतात १ उपाय- त्रास होतील दूर

तिसरा उपाय करण्याासठी तुम्हाला बेकींग पावडर आणि व्हिनेगरची आवश्यकता असेल. या उपायानं तुम्ही प्लास्टीक आणि स्टिलच्या दोन्ही गाळण्या स्वच्छ करू शकता.  एका काचेच्या बाऊलमध्ये गाळणी ठेवा. २ चमचे बेकींग पावडर घ्या. त्यात १ एक चमचा पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. यात व्हाईट व्हिनेगर घालून ठेवा. त्यात बबल्स आल्यानंतर टुथपेस्टनं गाळणी घासून स्वच्छ करा.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनकिचन टिप्स