Lokmat Sakhi >Social Viral > चहाची गाळणी खूपच काळवंडली? १ सोपा उपाय, कमी मेहनतीत गाळणी होईल चकाचक

चहाची गाळणी खूपच काळवंडली? १ सोपा उपाय, कमी मेहनतीत गाळणी होईल चकाचक

Cleaning Hacks: चहाची गाळणी स्टेनलेस स्टीलची (tea strainers) असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता. प्लास्टिकच्या गाळणीवर हा प्रयोग करू नये.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 05:44 PM2022-11-18T17:44:13+5:302022-11-18T17:44:54+5:30

Cleaning Hacks: चहाची गाळणी स्टेनलेस स्टीलची (tea strainers) असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता. प्लास्टिकच्या गाळणीवर हा प्रयोग करू नये.

How to clean tea strainers? Home remedies for cleaning tea strainers | चहाची गाळणी खूपच काळवंडली? १ सोपा उपाय, कमी मेहनतीत गाळणी होईल चकाचक

चहाची गाळणी खूपच काळवंडली? १ सोपा उपाय, कमी मेहनतीत गाळणी होईल चकाचक

Highlightsकाळपट गाळणंही कमी मेहनतीत अगदी स्वच्छ- चकाचक करता येतं. त्यासाठीच हा बघा एक सोपा उपाय.

चहाची गाळणी ही जवळपास प्रत्येक घरात अगदी रोजच्या रोज लागणारी वस्तू. काही घरांमध्ये तर दिवसातून ३- ४ वेळा त्या गाळण्याचा उपयोग होतो. प्रत्येकवेळी गाळणं चांगलं धुतलं किंवा अगदी २- ३ गाळण्या घरात असल्या तरी काही दिवसांनी त्या गाळण्यांना आपोआपच काळपटपणा येतो. चहाचे बारीक बारीक कण त्यात साचून राहतातच. असं कळकट झालेलं गाळणं मग अनेक जणी टाकून देतात. पण असं काळपट गाळणंही कमी मेहनतीत अगदी स्वच्छ- चकाचक (How to clean tea strainers?) करता येतं. त्यासाठीच हा बघा एक सोपा उपाय.

 

कळकट गाळणं कसं करायचं स्वच्छ?
हा उपाय इन्स्टाग्रामच्या behind_that_house या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यासाठी आपल्याला लिक्विड ब्लीच आणि पाणी या दोनच गोष्टी लागणार आहेत.

आजीबाईंनी हौशीने करून घेतला सुंदर मेकअप! बघा आजींच्या मेकअपचा व्हायरल व्हिडिओ 

यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात लिक्विड ब्लीच आणि पाणी या दोन गोष्टी सम प्रमाणात घ्या. त्यानंतर तुमचं खराब झालेलं गाळणं यात २ ते ३ तासांसाठी भिजत ठेवा. त्यानंतर तारेच्या घासणीने ते गाळणं घासून काढा. गाळणं अगदी स्वच्छ, चकाचक होऊन जाईल. ब्लीच आरोग्यासाठी हानिकारक असतं. त्यामुळे गाळणं त्यानंतरही काही तास पाण्यात भिजत ठेवा. २- ३ वेळा पाणी बदलून धुवून घ्या. पुर्णपणे वाळवून घ्या आणि त्यानंतरच वापरा.

 

गाळणी खूपच घाण झाली असेल तर...
१. गाळणी खूपच घाण झाली असेल आणि वरील उपाय करूनही स्वच्छ होत नसेल, तर हा पुढचा उपाय करून बघा.

बघा कशी बहरलीये प्रिती झिंटाची 'घर की खेती'! बागेत पिकलेल्या संत्रीविषयी म्हणाली.... 

२. लिक्विड ब्लीच आणि पाणी यांच्या मिश्रणामध्ये थाेडं डिर्टजंट किंवा लिक्विड सोप टाका. आणि त्यात गाळणं पुन्हा २ ते ३ तास भिजत ठेवा.

३. त्यानंतर गाळणीला थोडी पिंताबरी लावा आणि तारेच्या घासणीने ती घासून काढा. 

 

Web Title: How to clean tea strainers? Home remedies for cleaning tea strainers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.