प्रत्येक घरामध्ये गॅस शेगडी असतेच (Gas Burner). गॅस शेगडीशिवाय आपण स्वयंपाकाची कल्पनाही करू शकत नाही. पण अनेकदा स्वयंपाक करताना बर्नरवर तेल किंवा ग्रेव्ही सांडते (Cleaning Tips). ज्यामुळे बर्नरची छिद्रे ब्लॉक होतात. या कारणाने ज्योत कमी-जास्त होते. शिवाय सिलेंडरही वाया जातो (Kitchen Tips). गॅसची फ्लेम कमी जास्त होत असल्यामुळे, आपण मेकॅनिकला बोलावून घेतो. ज्यामुळे जास्त खर्च होतो. पण आपण देखील फ्लेम चेक करू शकता.
अनेकदा बर्नरमुळेही गॅसची फ्लेम कमी किंवा जास्त वाढते. त्यामुळे बर्नर योग्यवेळी साफ करणं गरजेचं आहे. जर आपल्याला गॅस स्टोव्हचे बर्नर किचकट वाटत असेल तर, ३ टिप्सचा वापर करा. या टिप्सच्या मदतीने काही मिनिटात बर्नर क्लिन होईल. शिवाय गॅस व्यवस्थित चालेल(How to Clean the Burners on a Gas Stove - 3 Tricks).
गॅस स्टोव्हचे बर्नर स्वच्छ करण्यासाठी टिप्स
पहिली पद्धत
सर्व प्रथम, स्टोव्हमधून बर्नर काढा. यानंतर, बर्नरवर अडकलेली घाण सुती कापडाने पुसून काढा. यानंतर एका वाटीत एक चमचा डिशवॉशिंग लिक्विड घ्या. नंतर त्यात एक कप कोमट पाणी घाला. नंतर त्यात बर्नर ठेवा. पाणी थंड झाल्यावर बर्नर पाण्यातून बाहेर काढा, व स्क्रबरने घासून स्वच्छ करा. या ट्रिकमुळे काही मिनिटांतच बर्नरवर साचलेली घाण आणि काळेपणा निघून जाईल.
२ मिनिटांत तयार होणारे नूडल्स खाता की दवाखान्यात भरती व्हायची तयारी करताय? वाचा, नक्की होतं काय..
दुसरी पद्धत
गॅस स्टोव्हचे बर्नर स्वच्छ करण्यासाठी एका वाटीत एक चमचा डिशवॉश लिक्विड घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. आता मिश्रणात गॅस बर्नर काही वेळासाठी ठेवा. २० मिनिटानंतर बर्नर जुन्या टूथब्रशने पूर्णपणे स्वच्छ करा, आणि नंतर पाण्याने बर्नर धुवून घ्या.
पोटात नुसती आग? गॅसेसचा त्रास? उन्हाळ्यात हे ५ जादूई पदार्थ खा, पोटाला मिळेल गारवा
तिसरी पद्धत
एका वाटीत कोमट पाणी घ्या. त्यात एक लिंबाचा रस, एक चमचा इनो, एक चमचा मीठ आणि १ चमचा डिशवॉश लिक्विड घालून मिक्स करा. आता या मिश्रणात बर्नर ठेवा आणि २ मिनिटानंतर स्क्रबरने बर्नर घासा, व पाण्याने धुवून काढा.