Join us  

Cleaning tips and tricks: पिवळ्या पडलेल्या फरशा लख्ख-स्वच्छ होण्यासाठी ३ उत्तम उपाय, झटपट सफाईची मस्त ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 6:28 PM

Home hacks for cleaning floor: कितीही स्वच्छ केली तरी फरशी पिवळटच दिसते ना.... म्हणूनच तर खूप मेहनत न घेता फरशीला स्वच्छ आणि चकचकीत करायचं असेल तर हे काही सोपे उपाय करून बघा..

ठळक मुद्देपिवळट, डागाळलेली फरशी झटपट आणि कमी कष्टात स्वच्छ करणं अगदी सोपं आहे. त्यासाठी फक्त या काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून बघा...

घरातली फरशी जसजशी जुनी होत जाते, तसतसा तिचा रंग बदलत जातो. दररोज फरशी (how to clean the yellowish floor) पुसताना आपण खूप काही काळजी घेत नाही. त्यामुळे मग फरशी हळूहळू खराब, मळकट दिसू लागते. पुसल्यावर स्वच्छ होते, त्यावरची घाण, धुळ निघून जाते पण तरीही पिवळट पडत चालल्याने ती अस्वच्छ वाटते. दोन फरशांमध्ये असणारे जॉईंट्सही मग काळे पडत जातात. अशी घाण, पिवळट, डागाळलेली फरशी झटपट आणि कमी कष्टात स्वच्छ करणं अगदी सोपं आहे. त्यासाठी फक्त या काही टिप्स आणि ट्रिक्स (Home hacks for cleaning floor) फॉलो करून बघा...

 

पिवळट दिसणारी फरशी कशी करायची स्वच्छ...(Home remedies for cleaning floor)१. मध्यम आकाराची अर्धी बादली भरून पाणी घ्या. त्यामध्ये दोन लिंबांचा रस पिळून टाका. त्यात अर्धा टेबलस्पून बेकींग सोडा (lemon and baking soda) टाका. या मिश्रणाने फरशी पुसा. ज्या ठिकाणी खूप जास्त पिवळटपणा आहे, त्या ठिकाणी हे मिश्रण टाकून ठेवा. ५ ते १० मिनिटांनी ब्रशने घासा. पिवळटपणा कमी होऊन फरशी स्वच्छ दिसू लागेल. 

 

२. दोन मग पाणी घ्या. त्या पाण्यात दोन टेबलस्पून व्हिनेगर आणि एक टेबलस्पून वॉशिंग पावडर (vinegar and washing powder) टाका. हे पाणी फरशीवर टाकून ठेवा. काही वेळाने ब्रशने घासून घ्या. फरशी स्वच्छ दिसेल आणि पिवळटपणा कमी झालेला जाणवेल.

 

३. टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचअप (tomato sauce for cleaning floor) देखील फरशीचा पिवळटपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो. हा प्रयोग करून बघायचा असेल तर फरशी ज्या ठिकाणी पिवळी पडली असेल किंवा अस्वच्छ झाली असेल, त्या जागेवर टोमॅटो सॉस टाका. हाताने तो जमिनीवर व्यवस्थित पसरवून घ्या. ५ ते ७ मिनिटांनी त्यावर थोडे पाणी शिंपडा आणि ब्रशच्या मदतीने ती जागा घासून काढा. यानंतर फरशीवर गरम पाणी टाकून फरशी स्वच्छ पुसून घ्या. डाग होतील कमी आणि फरशी होईल चकाचक... 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसुंदर गृहनियोजनहोम रेमेडीस्वच्छता टिप्स