Join us  

वारंवार टॉयलेट घासण्याची गरजच नाही- १ सोपा उपाय- न घासताही टॉयलेट राहील स्वच्छ, सुगंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2024 9:15 AM

How To Keep Toilet Clean And Fresh Always: वारंवार न घासताही टॉयलेट कसं स्वच्छ ठेवायचं, याचा एक सोपा उपाय पाहा...

ठळक मुद्देहा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक आपल्या घरात अगदी सहज मिळणारी वस्तू वापरायची आहे

घरातल्या टॉयलेट, बाथरुम या भागांची स्वच्छता करणं अतिशय गरजेचं असतं. आपण घरातले इतर भाग जसे स्वच्छ ठेवतो, तशीच स्वच्छता टॉयलेट- बाथरुमची ठेवणंही गरजेचं आहे. पण अनेक जणींना वारंवार टॉयलेट स्वच्छ करण्याचा कंटाळा येतो. किंवा तेवढा वेळ त्यांच्याकडे नसतो. असं तुमच्याही बाबतीत असेल तर हा एक सोपा उपाय पाहा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक आपल्या घरात अगदी सहज मिळणारी वस्तू वापरायची आहे (1 simple trick for maintaining toilet hygiene). त्या वस्तूचा वापर केल्यास तुमचं कमोड वारंवार न घासताही अगदी स्वच्छ राहील. शिवाय त्याच्यातून दुर्गंधीही येणार नाही. (How to clean toilet)

टॉयलेट स्वच्छ ठेवण्याचा उपाय

 

वारंवार न घासताही टॉयलेट स्वच्छ ठेवायचं असेल तर त्यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा एक व्हिडिओ diy2insta या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्या टुथपेस्टचा वापर करायचा आहे. 

मेनोपॉजमुळे शांत झोप नाही- डिप्रेशन येतं? पुजा माखिजा सांगतात ४ पदार्थ खा- मेनोपॉज होईल सुसह्य

यासाठी एक टुथपेस्ट घ्या. टुथपेस्टच्या पाकिटावर खालच्या बाजुने पिन वापरून काही छिद्र करून घ्या.

यानंतर टुथपेस्टचा जो सगळ्यात खालचा भाग असतो, त्याच्या दोन्ही बाजुंनी तिरके छेद द्या. 

 

आता ही टुथपेस्ट तुमच्या टॉयलेटच्या वॉटर स्टोरेज टँकमध्ये ठेवून द्या. 

ईशा अंबानीच्या लेहेंगा चोलीवर सजले खरेखुरे जडाऊ दागिने; नजाकतीचं सुंदर काम- पाहा व्हायरल व्हिडिओ

आता यामुळे थोडी थोडी टुथपेस्ट लीक होईल आणि वॉटर टँकमधील पाण्यात मिक्स होईल.  तुम्ही जेव्हा जेव्हा फ्लश कराल, तेव्हा तेव्हा ते पाणी टॉयलेटमध्ये येईल. यामुळे आपोआपच टॉयलेट स्वच्छ होईल आणि शिवाय टुथपेस्टच्या सुगंधामुळे नेहमीच सुवासिक राहील. 

टुथपेस्टमध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक टॉयलेट स्वच्छ ठेवण्यास मदत करतील. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलहोम रेमेडी