घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्यासोबत टॉयलेट (Toilet) देखील स्वच्छ करणं गरजेचं आहे. अनेकदा टॉयलेट अधिक वेळ स्वच्छ न केल्यानं त्यातून दुर्गंधी येऊ लागते (Cleaning Tips). यासोबत पिवळट डाग दिसू लागतात. पिवळट डागांमुळे टॉयलेट अधिक खराब दिसू लागते. ज्यामुळे न दिसणारे किटाणू घरभर पसरतात. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नियमित टॉयलेट साफ करणं गरजेचं आहे.
अनेकदा टॉयलेटला तासंतास घासत बसावे लागते. ब्रशने घासूनही टॉयलेटवरील पिवळटपणा निघत नाही. ज्यामुळे टॉयलेट घासूनही अस्वच्छ दिसू लागते. जर महागडे क्लीनरनाही ब्रशने घासूनही टॉयलेट स्वच्छ होत नसेल तर, १० रुपयांच्या फ्रुट सॉल्टचा वापर करून पाहा. यामुळे नक्कीच टॉयलेट मिनिटांत स्वच्छ होईल(How to Clean Toilet Stains: Expert Tips for Spotless Results).
घरगुती क्लीनर करण्यासाठी सोपा उपाय
इनो (फ्रुट सॉल्ट)
मीठ
लिंबू
बेकिंग सोडा
किचन सिंक सतत तुंबते? पाईपला गुंडाळा 'ही' १ गोष्ट; मग बघा कमाल - सिंक ब्लॉकची कटकटच सुटेल
डिटर्जंट
अशाप्रकारे घरीच तयार करा क्लीनर
सर्वात आधी एका भांड्यात अर्धा लिटर पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस, इनो, मीठ, बेकिंग सोडा आणि १ चमचा डिटर्जंट घालून मिक्स करा. तयार क्लीनर टॉयलेट सीटमध्ये घाला. जर टॉयलेट अधिक घाणेरडे झाले असेल तर, त्यात जास्त प्रमाणात बेकिंग सोडा घाला.
कंबर, मांड्या - थुलथुलीत पोट कमीच होत नाही? कोमट पाण्यात घाला 'या' फळाचा रस; वजन घटेल - दिसाल सुडौल
ब्रशने तयार क्लीनर सीटमध्ये पसरवा. काही काळ तसेच राहूद्या. नंतर ब्रशने टॉयलेट स्वच्छ करून घ्या. जेणेकरून जास्त वेळ घासावे लागणार नाही. डाग निघेपर्यंत टॉयलेट घासून घ्या, नंतर पाण्याने टॉयलेट स्वच्छ करून घ्या. तुमचे टॉयलेट नव्यासारखे चमकेल. आपण या क्लीनरचा वापर आठवड्यातून एकदा करू शकता. यामुळे नक्कीच टॉयलेटमधील पिवळट डाग गायब होतील.