Lokmat Sakhi >Social Viral > टॉयलेट साफ करायला किळस येते? हात न लावता, ब्रश न वापरता टॉयलेट स्वच्छ करा, सोपी ट्रिक

टॉयलेट साफ करायला किळस येते? हात न लावता, ब्रश न वापरता टॉयलेट स्वच्छ करा, सोपी ट्रिक

How to Clean Toilet Without Using Brush : काहीजण पटापट ब्रश फिरवून कामापासून सुटका मिळवतात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 11:23 PM2024-10-08T23:23:12+5:302024-10-08T23:40:08+5:30

How to Clean Toilet Without Using Brush : काहीजण पटापट ब्रश फिरवून कामापासून सुटका मिळवतात

How to Clean Toilet Without Using Brush : How To Clean Toilet Not Using Hands | टॉयलेट साफ करायला किळस येते? हात न लावता, ब्रश न वापरता टॉयलेट स्वच्छ करा, सोपी ट्रिक

टॉयलेट साफ करायला किळस येते? हात न लावता, ब्रश न वापरता टॉयलेट स्वच्छ करा, सोपी ट्रिक

टॉयलेट सीटचा वापर रोज केला जातो. जर घरात वारंवार शौचालयाचा वापर होत असेल तर घाण होते. अशा स्थितीत शौचालय नेहमी साफ करण्याची गरज असते.  (Cleaning Hacks & Tips) अनेकांना शौचालय साफ करणं खूप कठीण काम वाटतं तर काहींना किळस येते.  काहीजण पटापट ब्रश फिरवून कामापासून सुटका मिळवतात. टॉयलेट सीट साफ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात घेतल्या तर टॉयलेट सिट लगेच स्वच्छ होईल आणि जराही मेहनत करावी लागणार नाही. तुम्ही स्वत: ट्राय करू शकता असे काही हॅक्स पाहूया. (How To Clean Toilet)

जर तुम्ही काही दिवसांच्या ठराविक अंतराने टॉयलेट साफ करत नसाल तर तर त्यात करोडो बॅक्टेरियाज येऊ लागतात. एकदा टॉयलेट फ्लश केल्यानं सर्व बॅक्टेरियाज निघून जात नाहीत. अशा स्थितीत टॉयलेट स्वच्छ न  केल्यास शेकडो आजार होऊ शकतात. (How To Clean Toilet Not Using Hands)

ब्रशनं रगडून टॉयलेट सिट साफ करायचं नसेल तर तुम्ही ऑटोमेटीक क्लिनरचा वापर करू शकता.  यासाठी हे क्लिनर फक्त तुम्हाला टॉयलेटमध्ये ठेवावं लागेल. ज्यामुळे प्रत्येक फ्लश न करता साफसफाई होईल. तुम्ही पाकीटावर लिहिलेल्या गाईडलाईन्स फॉलो करू शकता.

क्लिनिंग टॅब्लेट

टॉयलेटची साफसफाई करणाऱ्या टॅब्लेट हळूहळू ब्लिच क्लिनिंग केमिकल्स रिलिज करतात.  ज्यामुळे घातक बॅक्टेरियाज निघून जाण्यास मदत होते. या पद्धतीने ब्रश केल्यास टॉयलेट सिट रगडून घासावी लागणार नाही. ही टॅब्लेट तुम्हाला टँकमध्ये टाकावी लागेल.

व्हिनेगर

टॉयलेटमध्ये तुम्ही जवळपास १ कप व्हिनेगर घालू शकता. व्हिनेगर ब्रशने चारही बाजूंनी व्यवस्थित फिरवून स्वच्छ करा. जवळपास १ मिनिटानंतर बेकिंग सोडा घालून १ एक कप व्हिनेगर घाला.  हे मिश्रण ३० मिनिटांसाठी लावलेलं राहू द्या.  नंतर टॉयलेट ब्रशनं डाग स्वच्छ करा.

डेंचर क्लिनिंग टॅब्लेट

१ किंवा २ डेंचर क्लिनिंग टॅब्लेट तुम्ही टॉयलेटमध्ये घालू शकता. नंतर त्यातून वाफ निघू लागेल आणि पाणी निळं होईल. जवळपास २० मिनिटं तसंच ठेवा आणि नंतर फ्लश करा.  या पाण्यानं सर्व डाग निघून जाण्यास मदत होईल आणि ब्रश न लावता साफ करा.

Web Title: How to Clean Toilet Without Using Brush : How To Clean Toilet Not Using Hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.