Join us  

शाळेची सॅक - ऑफिसची बॅग घाण झाली? १ ट्रिक - न घासताही बॅग होईल स्वच्छ, दिसेल नवीकोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2024 8:03 PM

How to Clean / Wash School Bag Easily Without Washing : बॅग आपण महिनोमहिने स्वच्छ करत नाही; यासाठीच खास ट्रिक

आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे (Busy Lifestyle) लोकांना स्वच्छतेकडे फारसे लक्ष देता येत नाही (Cleaning Tips). कपड्यांसह बॅग्सही अस्वच्छ होतात. लोक अस्वच्छ कपडे वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतात (Washing tips). पण शाळेच्या किंवा लॅपटॉप बॅग घाण झाली तर, वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुता येत नाही. यासाठी आपल्याला बाथरूममध्ये (Cleaning Hacks) बसून बॅग्स धुवावे लागतात.

बरेच महिने ऑफिस बॅग धुतली नाही तर, त्यातून दुर्गंधीही येऊ लागते. जर ऑफिस आणि शाळेची बॅग्स झटपट धुवायची असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. अगदी काही मिनिटात बॅग्स धुतले जातील. शिवाय बॅगमध्ये जमा झालेली धूळ, घाणही त्वरित साफ होईल(How to Clean / Wash School Bag Easily Without Washing).

बॅग साफ करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

- बॅग साफ करण्यापूर्वी त्यातून सगळ्याच महत्वाच्या वस्तू काढून ठेवा. शिवाय बॅगच्या फॅब्रिकचीही काळजी घ्या, चामड्याच्या बॅग जास्त वेळ पाण्यात ठेवू नका. अधिक वेळ पाण्यात राहिल्याने त्या खराब होऊ शकतात.

सुटलेलं पोट कमीच होत नाही? 'या' पौष्टीक पीठाचे सूप प्या; वेट लॉस होईल - दिसाल सुडौल सुंदर

बॅग स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा एक टीप

- डिटर्जंट

- कॉस्टिक सोडा

- व्हिनेगर

- बेकिंग सोडा

या पद्धतीने बॅग्स स्वच्छ करा

- बॅगमधून सर्व महत्त्वाच्या वस्तू बाहेर काढा. आता एका टबमध्ये अर्धा टब पाणी भरा आणि त्यात लिक्विड डिटर्जंट , कॉस्टिक सोडा, व्हिनेगर आणि थोडा बेकिंग सोडा घाला.

- सर्वकाही चांगले मिसळा, त्यात बॅग ३-४ तासांसाठी भिजत ठेवा.

सर्दी - खोकला, ॲसिडिटीचा त्रास होईल छूमंतर; फक्त चहामध्ये घाला 'ही' खास पांढरी पावडर; तब्येत सुधारेल

- ४ तासात बॅगमध्ये अडकलेली घाण, धूळ निघून जाईल. नंतर ब्रशने बॅग स्वच्छ धुवून घ्या.

- आपल्याकडे वॉशिंग मशिन असल्यास, वॉशिंग मशिनमध्ये ठेवून बॅग स्वच्छ करा. नंतर पाण्याने बॅग धुवून वळत घाला. या पद्धतीने बॅग धुतल्यास अगदी काही वेळात स्वच्छ होतील. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल