Lokmat Sakhi >Social Viral > न घासता १० मिनिटांत वॉशिंग मशिन होईल नव्यासारखं चकाचक, बघा स्वच्छता करण्याची सोपी ट्रिक

न घासता १० मिनिटांत वॉशिंग मशिन होईल नव्यासारखं चकाचक, बघा स्वच्छता करण्याची सोपी ट्रिक

Simple And Easy Method Of Cleaning Washing Machine: वॉशिंग मशिन आतल्या बाजुने खूप अस्वच्छ झालं असेल तर ते न घासता कमीत कमी मेहनतीत कसं स्वच्छ करायचं ते पाहा.. (How to clean washing machine from inside)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 12:56 PM2024-06-28T12:56:28+5:302024-06-28T12:58:00+5:30

Simple And Easy Method Of Cleaning Washing Machine: वॉशिंग मशिन आतल्या बाजुने खूप अस्वच्छ झालं असेल तर ते न घासता कमीत कमी मेहनतीत कसं स्वच्छ करायचं ते पाहा.. (How to clean washing machine from inside)

How to clean washing machine from inside, cleaning tips for automatic washing machine, simple and easy method of cleaning washing machine | न घासता १० मिनिटांत वॉशिंग मशिन होईल नव्यासारखं चकाचक, बघा स्वच्छता करण्याची सोपी ट्रिक

न घासता १० मिनिटांत वॉशिंग मशिन होईल नव्यासारखं चकाचक, बघा स्वच्छता करण्याची सोपी ट्रिक

Highlightsविशेष म्हणजे तुम्हाला हातात ब्रश किंवा घासणी घेऊन मशिन घासत बसण्याची अजिबातच गरज नाही.

बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की वॉशिंग मशिनचा वापर तर ते अगदी दररोज करतात. पण त्याची स्वच्छता करण्याचं मात्र विसरून जातात. आपले रोजचे कपडे स्वच्छ करणारं वॉशिंग मशिन आतल्या बाजुनेही स्वच्छ, चकाचक असणं गरजेचं आहे. अन्यथा काही दिवसांनी मग त्या मशिनमधून कुबट वास येऊ लागतो. तरीही त्याची स्वच्छता करण्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर तो कुबट वास मग कपड्यांनाही लागतो. असं होऊ नये म्हणून नियमितपणे मशिनची स्वच्छता करणं गरजेचं आहे. तुम्हाला हे काम अवघड वाटत असेल तर ते अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहा (How to clean washing machine from inside). विशेष म्हणजे ते करण्यासाठी तुम्हाला हातात ब्रश किंवा घासणी घेऊन मशिन घासत बसण्याची अजिबातच गरज नाही. (simple and easy method of cleaning washing machine)

 

वॉशिंग मशिन आतल्या बाजुने स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

वॉशिंग मशिन कमीतकमी मेहनतीत आतल्या बाजुने कसं स्वच्छ करावं, याची एक सोपी ट्रिक leeyonce_shine या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. ही ट्रिक तुम्ही ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.

पावसाळ्यात मुलं शाळेत जातात आणि दुखणं घेऊन येतात-५ पदार्थ खाऊ घाला, इम्युनिटी भरपूर वाढेल

यासाठी सगळ्यात आधी १- २ लिंबू घ्या आणि ते मधोमध कापून त्याच्या दोन फोडी करा. आता या लिंबांवर तुमच्याकडचं कोणतंही टुथपेस्ट लावा. 

 

मशिनचं झाकण उघडल्यानंतर त्याच्या आत जे रबर असतं, त्या रबरावर थोडा बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाका. तसेच मशिनच्या झाकणाच्या काचेवर आतल्याबाजुने थोडं  टुथपेस्ट लावून घ्या. 

महिने टिकेल असं इडलीचं पीठ एकदाच बनवून ठेवा, पाहिजे तेव्हा १० मिनिटांत इडल्या तयार... 

यानंतर मशिनच्या वॉश सायकलमध्ये जो "Drum Clean" हा पर्याय असतो तो निवडा. जर तुमच्याकडच्या मशिनसाठी हा पर्याय उपलब्ध नसेल तर नेहमीप्रमाणे फक्त १५ मिनिटांसाठी वॉश सायकल सुरू करा. लिंबू, टुथपेस्ट, बेकिंग सोडा, व्हिनेगर यांच्या एकत्रित परिणामामुळे तुमचं वॉशिंग मशिन आतल्या बाजुने स्वच्छ होऊन अगदी लख्खं चमकेल.

 

Web Title: How to clean washing machine from inside, cleaning tips for automatic washing machine, simple and easy method of cleaning washing machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.