Join us  

वॉशिंग मशिन खूपच घाण झालं, डाग पडले? ३ उपाय.. मशिन होईल स्वच्छ, चमकेल अगदी नव्यासारखं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 12:44 PM

Home Remedies For Cleaning Washing Machine: कपडे स्वच्छ धुणारं वॉशिंग मशिनच कधी कधी एकदम कळकट होऊन जातं. म्हणूनच कमी मेहनतीत ते कसं झटपट स्वच्छ करायचं याचे हे काही खास उपाय.

ठळक मुद्देअस्वच्छ झालेलं मशिन स्वच्छ कसं करायचं, त्यासाठी हे काही सोपे उपाय.

बऱ्याच घरांमध्ये कपडे धुण्यासाठी अगदी रोजच मशिनचा वापर केला जातो. रोज रोज पाण्याचा किंवा कळकट कपड्यांचा संबंध येत असल्याने मशिनही खराब होतं. त्यावर अनेक काळपट, पिवळट डाग (stains) पडतात. मशिन (washing machine) व्यवस्थित कोरडं होऊ न देता लगेच झाकण लावल्याने त्यावर बुरशीही येते. असं अस्वच्छ झालेलं मशिन स्वच्छ कसं करायचं, त्यासाठी हे काही सोपे उपाय. (How to get rid of stains on washing machine)

 

टॉप लोड वॉशिंग मशिन स्वच्छ करण्याचे उपाय१. व्हिनेगरच्या मदतीने वॉशिंग मशिन अगदी नव्यासारखे चमकवता येते. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी मशिनला हॉट टेम्परेचरवर सेट करा.

पुदिना फेसपॅक! पुदिन्याचे ८ जबरदस्त उपयोग, तुमच्या त्वचेला बनवतील अधिक सुंदर आणि मुलायम 

यानंतर मशिनमध्ये गरम पाणी टाका. त्यात साधारण ५ ते ६ टेबलस्पून एवढं व्हाईट व्हिनेगर टाका. मशिन खूप जास्त घाण झालं नसेल तर व्हिनेगर टाकणं पुरेसं आहे. पण जर मशिन खूपच काळवंडलं असेल तर मात्र व्हिनेगरसोबतच त्यात साधारण २ ते ३ टेबलस्पून एवढा बेकिंग सोडाही टाकावा. 

 

२. हे दोन्ही टाकल्यानंतर ५ ते १० मिनिटांसाठी मशिन सुरू करा. त्यानंतर पुढचा एक तास मशिन झाकण लावून बंद ठेवा. त्यानंतर पुन्हा ५ मिनिटांसाठी मशिन चालू करा आणि नंतर मशिनमधले हे पाणी काढून टाका. पाणी निघून गेल्यानंतर एका कोरड्या सुती कपड्याने मशिन स्वच्छ पुसून घ्या.

 

३. मशिन सेमी ऑटोमॅटीक असेल तर...जर तुमचे मशिन सेमी ऑटोमॅटीक प्रकारातले असेल किंवा ऑटोमॅटीक मशिन बाहेरच्या बाजूने स्वच्छ करायचे असेल तर ही पद्धत वापरू शकता.  

फक्त एकच व्यायाम, चरबी वितळेल झटपट... कॅलरी बर्नसाठी मलायका अरोरा सांगतेय खास व्यायाम

यासाठी साधारण एक मग पाणी घ्या. त्यात ३ ते ४ टेबलस्पून व्हिनेगर आणि २ ते ३ टेबलस्पून बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण मशिनवर आतून बाहेरून शिंपडा. ५ ते ७ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. रबरच्या घासणीने घासूनही तुम्ही स्वच्छ करू शकता. पण खूप जोरजोरात घासू नये. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी