Join us  

पाण्याच्या बाटलीला वास येतो, काळपट थर जमा झालाय? पाहा बाटली साफ करण्याची १ सोपी ट्रीक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 12:43 PM

How To Clean Water Bottles : बाटलीला घाण राहीली आणि पाण्यावाटे ती आपल्या पोटात गेली तर आरोग्याच्यादृष्टीनेही ते चांगले नसते.

ठळक मुद्देअनेकदा बाटल्यांमध्ये कुबट वास येतो किंवा बाटलीच्या झाकणात आणि तोंडाशी काळा थर जमा होतो.आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर स्वच्छता आवश्यक आहे

आपण सगळेच पाण्याच्या बाटल्या नियमितपणे वापरतो. शाळेत, कॉलेजला किंवा ऑफीसला नेण्यासाठी आपण पाण्याच्या बाटल्या वापरतो. अनेकदा घरातही फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी किंवा पाहुण्यांना देण्यासाठी बाटल्यांचा वापर केला जातो. यामध्ये अगदी साध्या प्लास्टीकपासून, स्टीलच्या, पितळ्याच्या अशा विविवध प्रकारच्या बाटल्या असतात. पाणी पिण्यासाठी बाटली सोयीची असल्याने आपण सर्रास त्यांचा वापर करतो. अपण सतत वापरली जाणारी ही बाटली आपल्याकडून नीट साफ केली जात नाही. त्यामुळेच अनेकदा बाटल्यांमध्ये कुबट वास येतो किंवा बाटलीच्या झाकणात आणि तोंडाशी काळा थर जमा होतो. अनेकदा आपण बाटली पाण्याने विसळतो आणि तशीच भरतो. पण यामुळे बाटली पूर्णपणे स्वच्छ होतेच असे नाही (How To Clean Water Bottles). 

बाटलीला घाण राहीली आणि पाण्यावाटे ती आपल्या पोटात गेली तर आरोग्याच्यादृष्टीनेही ते चांगले नसते. बाटली निमुळती असल्याने आपला हातही त्यात जाऊ शकत नाही. मग आतूल्या बाजुनेही एकप्रकारचा थर जमा होतो.  अशावेळी आ बाटल्या साफ कशा करायचा असा एक प्रश्न अनेकांपुढे असतो. हल्ली बाजारात त्यासाठी वेगळे ब्रशही मिळतात पण आपल्याकडे ते ब्रश नसतील आणि घरच्या घरी आपल्याला सोप्या पद्धतीने बाटली साफ करायची असेल तर त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत. यामुळे अगदी ५ ते १० मिनीटांत बाटली साफ व्हायला मदत होईल आणि आपले आरोग्यही चांगले राहील. 

(Image : Google)

साहित्य -

१. व्हिम लिक्विड

२. १ चमचा सोडा 

३. तांदूळ - २ चमचा 

४. १ चमचा व्हिनेगर 

५. जुना झालेला टूथब्रश

बाटली साफ कशी करायची? 

१. बाटलीत थोडं पाणी घालायचं. त्यात चमचाभर व्हिनेगर, सोडा आणि तांदूळ आणि व्हिम लिक्विड घालायचे आणि बाटलीचे झाकण घट्ट लावायचे. 

२. यानंतर बाटली जोरजोरात हलवायची म्हणजे सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने एकत्र होतील आणि बाटली साफ करणे सोपे होईल.

(Image : Google)

३. आता हे मिश्रण बाटलीत काही वेळासाठी तसेच ठेवायचे आणि बाटली बाहेरच्या बाजुने स्वच्छ घासून घ्यायची. यासाठी आपण गॉज किंवा खराब झालेल्या टूथब्रशचा वापर करु शकतो. ब्रशमुळे कडांमध्ये अडकलेली घाण निघायला मदत होते.

४. त्यानंतर बाटली आतून आणि बाहेरुन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. 

५. आता टूथब्रशने बाटलीच्या आतला भाग आणि वरच्या कडां पुन्हा स्वच्छ घासून घ्या म्हणजे यात अडकलेली घाण निघण्यास मदत होते. 

६. पुन्हा बाटली पाण्याने स्वच्छ धुवा आणि उन्हात चांगली वाळवायला ठेवा. यामुळे बाटली स्वच्छ तर होईलच पण त्यातला वासही निघून जाण्यास मदत होईल. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स