Lokmat Sakhi >Social Viral > प्यायच्या पाण्याचा हंडा किंवा पिंप तुम्ही कशाने घासता? ही घ्या आजीची खास युक्ती- साबण-केमिकल टाळा

प्यायच्या पाण्याचा हंडा किंवा पिंप तुम्ही कशाने घासता? ही घ्या आजीची खास युक्ती- साबण-केमिकल टाळा

How To Clean Water Storage Utensils Without Using Detergent- Soap: 'ही' पाहा पाण्याची भांडी घासण्याची पारंपरिक पद्धत, भांड्यात साबणाचे कण राहण्याचं टेन्शन नाहीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2023 04:16 PM2023-12-12T16:16:45+5:302023-12-12T16:17:57+5:30

How To Clean Water Storage Utensils Without Using Detergent- Soap: 'ही' पाहा पाण्याची भांडी घासण्याची पारंपरिक पद्धत, भांड्यात साबणाचे कण राहण्याचं टेन्शन नाहीच...

How to clean water storage utensils without using detergent, soap or other chemicals, Natural and traditional method for cleaning water storage utensils | प्यायच्या पाण्याचा हंडा किंवा पिंप तुम्ही कशाने घासता? ही घ्या आजीची खास युक्ती- साबण-केमिकल टाळा

प्यायच्या पाण्याचा हंडा किंवा पिंप तुम्ही कशाने घासता? ही घ्या आजीची खास युक्ती- साबण-केमिकल टाळा

Highlightsहंडा, कळशी यांचे तोंड अरुंद असल्याने त्याच्या आतल्या भागात साबण चिकटली असेल तर ती दिसतच नाही. म्हणूनच पाण्याची भांडी धुण्याचा हा एक सोपा पारंपरिक उपाय पाहून घ्या...

आपण भांडी घासल्यानंतर ती अगदी स्वच्छ विसळून घेतो. पण तरीही भांड्यांमध्ये कधी कधी साबणाचे कण राहतातच. हल्ली तर घरोघरी डिशवॉश लिक्विड असते. साबणाने भांडी घासली तर भांड्याला चिकटलेले साबणाचे कण डोळ्यांना सहज दिसतात आणि आपण ते स्वच्छ पुसून घेऊ शकतो. पण डिशवॉश लिक्विडचा काही अंश भांड्यांना चिकटून राहिला, तर तो मात्र स्वच्छ करायला त्रास होतो (How to clean water storage utensils without using detergent, soap or other chemicals). शिवाय हंडा, कळशी यांचे तोंड अरुंद असल्याने त्याच्या आतल्या भागात साबण चिकटली असेल तर ती दिसतच नाही. म्हणूनच पाण्याची भांडी धुण्याचा हा एक सोपा पारंपरिक उपाय पाहून घ्या...(Natural and traditional method for cleaning water storage utensils)

 

पाणी साठवून ठेवण्याची भांडी स्वच्छ करण्याचा पारंपरिक उपाय

पाणी साठवून ठेवण्याची पाण्याची भांडी साबणाने किंवा डिशवॉशने स्वच्छ करण्याची भीती अनेक जणींना वाटते. त्यासाठीच आता भांड्यांची स्वच्छता करण्यासाठी हा एक सोपा आणि जुना पारंपरिक उपाय पाहून घ्या.

छोट्या कुंडीतही भरपूर फुलून येणारी ७ रोपं, बघा कमी जागेत भरपूर झाडं लावण्याचा खास उपाय..

हा उपाय home_sattva या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

यामध्ये पाणी भरून ठेवण्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी नाचणीचे पीठ वापरण्याचा सल्ला दिला आहे. नाचणीचे थोडे जाडेभरडे पीठ करून घ्या. हे पीठ पाण्यात कालवा आणि त्या पाण्याने पाण्याची भांडी आतून- बाहेरून घासून घ्या.

 

हा उपायही करून पाहा..

पाण्याची भांडी घासण्यासाठीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी वर दिलेला नाचणीच्या पिठाचा एक पर्याय तर आपण पाहिलाच. त्याशिवाय मीठ आणि लिंबू यांचा एकत्रित वापर करून त्या मिश्रणानेही तुम्ही पाण्याची भांडी घासू शकता.

पांढरे डाग पडल्याने नळ, शॉवर खूपच भुरकट दिसतात? १ सोपा उपाय करा, नव्यासारखी चमक येईल 

चिंचेचा कोळ करा. नारळाच्या शेंड्यांचा घासणीप्रमाणे वापर करून चिंचेचा कोळ लावून पाण्याची भांडी घासा. भांडी स्वच्छ होतील.

 

Web Title: How to clean water storage utensils without using detergent, soap or other chemicals, Natural and traditional method for cleaning water storage utensils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.