Join us  

पावसाळ्यात पाण्याच्या टाकीतून घाणं पाणी येतं, आत न जाता टाकी धुण्याचं पाहा सोपं टेक्निक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 4:18 PM

How To Clean Water Tank Easy Way : टाकी धुण्याच्या सोप्या ट्रिक्स लक्षात घेतल्या तर किचकट काम सोपं होईल.(How To Clean Water Tank)

पाण्याची टाकी प्रत्येकाच्याच घरी असते.  पावसाळ्याच्या दिवसांत टाकी स्वच्छ न केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. दुषित पाण्यामुळे लहानमुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच गंभीर समस्या उद्भवू शकतात. वेळेअभावी टाकी स्वच्छ करण्याच्या कामाकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. (Cleaning Tips) सतत पाणी जमा झाल्यामुळे टाकीमध्ये जाड थर तयार होतो आणि पाण्याला वास येऊ शकतो किंवा पाणी दुषित होऊ शकते. (How To Clean Water Tank Easy Way)

पाण्याची मोठी टाकी साफ करायचं म्हटलं तर ती आधी रिकामी करावी लागते. (Home Hacks) त्यानंतर आत शिरून स्वच्छ पाण्याने धुवावी लागते म्हणून अनेकजण टाकी धुवायचा कंटाळा  करतात. टाकी धुण्याच्या सोप्या ट्रिक्स लक्षात घेतल्या तर किचकट काम सोपं होईल.( How To Clean Water Tank)

1) तुरटीचा वापर करा

तुरटी पाण्याला स्वच्छ करण्याचे काम करते.  याच्या वापराने तुम्ही टाकीतलं पाणी स्वच्छ धुवू शकता. तुरटीने टाकी धुण्यासाठी सगळ्यात आधी टाकी अर्धी खाली करा. नंतर एका बादलीत पाणी घेऊन त्यात तुरटी घाला. थोड्यावेळानं हे पाणी टाकीच्या पाण्यात घाला. हे पाणी टाकीच्या पाण्यात घातल्यानंतर त्यातली घाणं खाली जमा होईल. नंतर एका स्वच्छ कापडाने टाकीत जमा झालेली घाण स्वच्छ करा. 

जेवल्यानंतर पोट डब्ब होतं-गॅस निघतो? किचनमधला हा पदार्थ खा, गॅस २ मिनिटांत दूर-पोटही साफ होईल

2) हायड्रोजन पेरोक्साईड

घरात लागलेली टाकी स्वच्छ करण्यासाठी हायड्रोजन पेरोक्साईड हा उत्तम उपाय आहे. यासाठी तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. एक मोठ्या पाण्याच्या टाकीला क्लिन करण्यासाठी 500 मिलीलिटर हायड्रोजन पॅरोक्साईड घ्या आणि टाकीच्या पाण्यात  मिसळा. 15 ते 20 मिनिटं तसंच सोडल्यानंतर  घराचे सर्व नळ सुरू करून टाकी खाली करा. हे पाणी बाहेर पडल्यानंतर टाकी स्वच्छ होईल.  टाकीचं पाणी बाहेर आल्यानंतर टाकी पुसून सुकवून घ्या नंतर त्यात दुसरं पाणी भरा.

मुलं सकाळी उठायला नाटक करतात? १ ट्रिक वापरा-रोज सकाळी न आवाज देता उठतील मुलं

3) वॉटर टँक क्लिनरचा वापर करा

बाजारात लिक्विड आणि पावडर स्वरूपात ब्लिच क्लिनर मिळतात. हे टँक क्लिनरच्या स्वरूपात ओळखले जाते. याच्या मदतीने तुम्ही टाकी स्वच्छ करू शकता. याच्या वापरासाठी 400 ग्रॅम पावडर ब्लिच किंवा 300 ग्रॅम लिक्विड ब्लिच घ्या. आता ही क्वांटिटी १० लिटर पाण्यात मिसळा. त्यानंतर हे मिश्रण पाण्याच्या टाकीत घाला. या पद्धतीने टाकी पूर्ण धुवून स्वच्छ करून घ्या. 

टॅग्स :सोशल व्हायरल