Lokmat Sakhi >Social Viral > How to Clean Water Tank :घरातली पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक; प्लबंरला न बोलावताही टाकी होईल झटपट स्वच्छ

How to Clean Water Tank :घरातली पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक; प्लबंरला न बोलावताही टाकी होईल झटपट स्वच्छ

How To Clean a Plastic Water Storage Tank : पावसाळ्यापूर्वीच पाण्याच्या टाक्या स्वच्छ करायला हव्यात, पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे आजार वाढतात. त्यामुळे आपल्या घरातल्या पाण्याच्या टाक्याही स्वच्छ ठेवायलाच हव्यात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 05:44 PM2022-07-07T17:44:00+5:302022-07-07T18:53:20+5:30

How To Clean a Plastic Water Storage Tank : पावसाळ्यापूर्वीच पाण्याच्या टाक्या स्वच्छ करायला हव्यात, पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे आजार वाढतात. त्यामुळे आपल्या घरातल्या पाण्याच्या टाक्याही स्वच्छ ठेवायलाच हव्यात.

How to Clean Water Tank Home : How to Clean a Plastic Water Tank Basic Steps of Water Tank Cleaning | How to Clean Water Tank :घरातली पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक; प्लबंरला न बोलावताही टाकी होईल झटपट स्वच्छ

How to Clean Water Tank :घरातली पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक; प्लबंरला न बोलावताही टाकी होईल झटपट स्वच्छ

आपण घरात रोज साफसफाई करत असलो, वस्तू जागच्याजागी ठेवत असलो तरी काही गोष्टींकडे नेहमी दुर्लक्ष होते. म(Home Cleaning Tips) खासकरून पावसाळ्यात डास, किडे, माश्यांचा उपद्रव वाढतो अशावेळ जर आपण घर स्वच्छ ठेवलं नाही तर आजारपणं येतात. विशेेत: घरात जर पाण्याची टाकी असेल तर ती पावसाळ्यापूर्वीच स्वच्छ करायला हवी. दुषित पाण्यानं होणारे आजार अनेक आहेत.  आता पाऊस सुरु झाला असला तरी पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेची बारकाईनं काळजी घ्यायला हवी. (How to Clean a Plastic Water Tank )
स्वच्छा पाण्यातही डास होतात. त्यात टाकीत शेवाळं, घाण असेल तर आजार होणं साहजिकच आहे. (How to clean water tank at home)

पाण्याचे पाईप, टाकी नेहमी स्वच्छ ठेवायला हवी. टाकी साफ करायची म्हटलं तर प्लंबरला बोलावून पाचशे ते हजार रूपये मोजावे लागतात.  मात्र ऐनवेळी तो ही उपलब्ध नसेल तर पाण्याची टाकी आपण घरच्याघरीही स्वच्छ करु शकतो.
(What is the easiest way to clean a water tank)


1) पहिली गोष्ट म्हणजे तुमची पाण्याची टाकी अर्ध्याहून अधिक रिकामी करणे. जर टाकी भरलेली असेल तर तुम्ही तुमच्या पाण्याच्या टाकीत जे काही क्लिनिंग एजंट वापरता ते चांगले काम करू शकणार नाही. (Basic Steps of Water Tank Cleaning)

2) तुरटीचा वापर करून तुम्ही टाकी स्वच्छ करू शकता. तुरटीचे काम पाणी स्वच्छ करणे आहे आणि त्यासाठी थोडी जास्त तुरटी  घ्यावी. अशा स्थितीत बादलीभर पाण्यात तुरटी मिसळून थोडावेळ तशीच राहू द्यावी आणि नंतर ते पाणी पाण्याच्या टाकीत मिसळा. तुरटीमुळे पाण्याच्या टाकीतली माती तळाशी चिकटून राहील.

घर लहान असलं तरी कमी जागेत पसारा न दिसता जास्त वस्तू ठेवण्याची पाहा ट्रिक, व्हायरल व्हिडिओ

३) हायड्रोजन पेरोक्साइड हे एक रसायन आहे ज्याद्वारे आपण अनेक वस्तू साफ करू शकता. मात्र, त्यानंतर पाण्याचा अजिबात वापर करू नका आणि टाकी पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतरच पुन्हा भरा. तुम्हाला त्यात 500 मिली हायड्रोजन पेरोक्साइड 15-30 मिनिटांसाठी विरघळवावे लागेल. लक्षात घ्या की हे प्रमाण मोठ्या टाकीसाठी आहे.

4) यानंतर, तुम्ही घरातील सर्व नळ उघडा.  जेणेकरून टाकीतील पाणी बाहेर पडेल. यानंतर, आपण कापडाने पाण्याची टाकी स्वच्छ करू शकता, यासाठी कापड मोठ्या लाकडात देखील गुंडाळले जाऊ शकते किंवा मोठा ब्रश वापरला जाऊ शकतो.  ही साफसफाई दीर्घकाळ टिकेल आणि नंतर आपण पुन्हा या टाकीमध्ये पाणी भरू शकता. या पद्धतीमुळे फक्त पाण्याची टाकीच स्वच्छ होणार नाही, तर नळांची आतील बाजूही सहज स्वच्छ होईल.

गर्लफ्रेंडशी कॉलवर बोलताना एक एअरपॉड बायकोच्या कानातच राहीला; अन् मग.., पाहा व्हिडिओ

5) टाकी साफ करणायाचे द्रव ब्लीच आणि ब्लीचिंग पावडर अशा दोन्ही स्वरूपात येते आणि जर तुम्ही ते वापरत असाल तर तुम्हाला 10 लिटर पाण्यात 400 ग्रॅम पावडर किंवा 300 मिली द्रव मिसळावे लागेल आणि ते 2-3 मिनिटे ठेवून टाकीतील पाणी रिकामे करावे लागेल.

6) पाण्याच्या टाकीत साबण किंवा डिटर्जंट सारख्या गोष्टी कधीही वापरू नका. कारण नंतर ते पूर्णपणे स्वच्छ करणे खूप कठीण होईल आणि पाण्याला अनेक दिवस साबणाचा वास येईल. पाण्याची टाकी साफ केल्यानंतर, 15-20 मिनिटे कोरडी होऊ द्या आणि नंतर पाणी पुन्हा भरा. पाण्याच्या टाकीत भरपूर माती साचली असेल तर ती कापड किंवा ब्रशच्या साहाय्याने  काढून टाकावी. 

Web Title: How to Clean Water Tank Home : How to Clean a Plastic Water Tank Basic Steps of Water Tank Cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.